'ही' असतात 'चिपकू' गर्लफ्रेन्डची लक्षणे, तुमची तर अशी नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:46 PM2019-02-15T12:46:06+5:302019-02-15T12:46:11+5:30

गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचं ब्रेकअप होण्याची आजकाल वेगवेगळी विचित्र कारणे बघायला मिळतात. पण टाळी एका हाताने वाजत नाही, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

Signs of clingy girlfriend, do you have this type of girlfriend | 'ही' असतात 'चिपकू' गर्लफ्रेन्डची लक्षणे, तुमची तर अशी नाही ना?

'ही' असतात 'चिपकू' गर्लफ्रेन्डची लक्षणे, तुमची तर अशी नाही ना?

Next

गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचं ब्रेकअप होण्याची आजकाल वेगवेगळी विचित्र कारणे बघायला मिळतात. पण टाळी एका हाताने वाजत नाही, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. तरीही काही लोकांच्या अशा सवयी असतात किंवा त्यांचं वागणं असं असतं जे कुणीही फार जास्त सहन करु शकत नाहीत. 

म्हणजे प्रेमाच्या नात्यात काही मुली फारच चिपकू असतात, असं बोललं जातं. खरंतर या गोष्टी मुलं आणि मुली दोघांसाठीही लागू होतात. पण जर तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करत असेल किंवा ते तुम्हाला स्पेसची मागणी करत असतील किंवा तुम्ही नात्याबाबत फार डिमांडिग झाला असाल तर तुम्ही फार चिपकू झाला आहात असे समजा.  

अशाप्रकारचं वागणं तुमच्या बॉयफ्रेन्डबाबत तुमची असुरक्षितता दर्शवतं. ही एखादी भीती असू शकते किंवा याला जास्त डिमांड करणं हेही कारणं असू शकतात. खरंतर हे आहे की, अशाप्रकारच्या पार्टनरपासून पुरुष अंतरच ठेवतात. चला जाणून घेऊ तुमच्या तुम्ही बॉयफ्रेन्डबाबत असुरक्षित झालात याचे काही संकेत....

सतत फोन करणे

Image result for clingy girlfriend gif

मनाई केल्यानंतरही तुम्ही सतत बॉयफ्रेन्डला फोन करत असाल, किंवा फोनला उत्तर न दिल्यावर काहीतरी चुकीचं झालं, असेल म्हणून सतत फोन करता असाल, तर हे चुकीचं आहे. हा तुमची असुरक्षितता दर्शवणारा संकेत आहे.

सतत लक्ष ठेवणं

Image result for stalking girlfriend gif

जर तुम्हाला त्याच्यावर विश्वास नसेल किंवा तुमच्या पाठीमागे तो काय करत असतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवत असाल. त्यांच्या सोशल मीडियात पोस्ट बघणे, त्यांचा फोन चेक करणे किंवा तो कुठे गेला असेल किंवा अचानक न सांगता तिथे पोहोचणे हे तुम्ही करायला लागता. यातून तुमची असुरक्षितता दिसते सोबतच याला चिपकू असाही शब्द काही लोक वापरतात. 

सतत त्यांच्यासोबत राहणे

Image result for hugging girlfriend gif

कधी-कधी हे ठिकही आहे. पण सतत त्यांच्यासोबत प्रत्येक जागी जाणे किंवा तसा हट्ट करणे हे दोघांच्याही डोकेदुखीचं कारण ठरु शकतं. प्रत्येकालाच आपलं स्वातंत्र्य प्रिय असतं. पण तुमच्या या वागण्याने तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्ही गमावू शकता. 

फक्त तो आणि तो

Image result for crying girlfriend gif

जर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींपासून पूर्णपणे वेगळे झाले असाल आणि तुमचं स्वत:चं असं आयुष्य राहिलंच नसेल. तुम्ही सतत त्याच्या आजूबाजूला फिरत असाल, तुम्ही हे विसरला असाल की, त्याचीही स्वत:ची लाइफ आहे. हे वागणं असेल तर तुमचं नातं फार काळ टिकू शकणार नाही. 

त्याच्या फॅमिली-फ्रेन्डना भेटायचंय

Image result for girlfriend wants to meet family gif

तुम्ही स्वत:ला पूर्णपणे त्याच्यात झोकून दिलंय आणि नात्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आतुर असाल, हेही तुमचं असुरक्षिततेचं लक्षण आहे. कदाचित तो तुम्हाला त्यांच्यासमोर घेऊन जाण्यास पूर्णपणे तयार नसेल आणि अशात तुम्ही जबरदस्ती कराल तर तो इरिटेड होणं स्वाभाविक आहे. या गोष्टीने वैतागून तुमचं ब्रेकअपही होऊ शकतं. 

या व्हिडीओमध्ये तुमची गर्लफ्रेन्ड कोणत्या टाइपची आहे.

Web Title: Signs of clingy girlfriend, do you have this type of girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.