Relationship: 'This' should be the reason for the age difference between couples! | Relationship : ​‘या’ कारणाने असावे जोडप्यांमध्ये वयाचे अंतर !

पुर्वी मुलगा व मुलीच्या वयात १० ते १५ वर्षांचा फरक असला तरी चालत असे. आता मात्र मुलामुलींच्या वयात एवढा अधिक फरक आढळत नसला तरी मुलाचे वय मुलीपेक्षा अधिक असायला हवे, असा प्रयत्न असतो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तरी असे आढळते की, बहुतांश जोडप्यांमध्ये मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असतो. 

लग्न करण्यापूर्वी मुलाच्या व मुलीच्या बाजूने अनेक गोष्टींचा विचार केला जातो. समोरच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, शिक्षण, स्वभाव या सर्व गोष्टी पडताळून बघितल्या जातात. यासोबतच लग्न जुळवताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली जाते, ती म्हणजे मुलगा व मुलीचे वय.

मुलगा व मुलगी यांचे नाते आणि वय यांचा परस्पर संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच होकारार्थी आहे. वयाचा मोठा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. मुलांच्या तुलनेत मुली मानसिकरित्या लवकर परिपक्व होतात. समवयीन मुलगा व मुलगी यांच्या स्वभावाचे आकलन केल्यास मुलगी मुलापेक्षा वैचारिक व भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व असल्याचे आढळते. अर्थात याला अपवादही असू शकतात. 
खालील काही मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल की मुलाचे वय मुलीपेक्षा अधिक का असायला हवे...

*  पैशांची कमतरता जाणवत नाही
जर एखादा मुलगा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसेल, तो अजूनही स्ट्रगलिंग झोनमध्ये तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकत नाही. या दृष्टीने पाहिल्यास लग्नासाठी मुलगी व मुलाच्या वयात फरक असणे आवश्यक आहे. यामुळे मुलाला आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यास वेळ मिळतो.  

* बायोलॉजीनुसार योग्य
पुरुष स्त्रियांच्या तुलनेत उशीरा परिपक्व होतात. या आधारे बघितल्यास मुलीपेक्षा मुलाचे वय जास्त असायला हवे. 

* भावनिक दृष्टिकोन
व्यक्तीमध्ये कधीतरी भावनिक स्थिरता येते. यासाठी नात्यात एज गॅप असणे आवश्यक आहे. या वयातील फरकामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणे सोपे ठरते.

Also Read : ​शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हणाल का?

Web Title: Relationship: 'This' should be the reason for the age difference between couples!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.