Relation 'these' sounds, the wife is not interested in you! | ​ Relation‘या’ संकेतांवरून समजावे, बायकोला आपल्यात रस नाही !

लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस असतात आणि लग्नाच्या काही वर्षानंतर त्याला तिच्यात रस नाही अन् तिला त्याच्या रस नाही, अशा गोष्टी ऐकायला येऊ लागतात. 

नव्याच्या नऊ दिवसानंतरही सकाळी उठल्यावर ती हसून आपल्या गुड मॉर्निंग म्हणते, आपण बाहेरून येण्याची आतुरतेने वाट बघते, जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आपलं नातं सुरक्षित आहे परंतू यावर आपण स्पष्ट नसाल तर जाणून घ्या असे आणखी कोणते संकेत आहे ज्याने बायकोला आपल्या रस नाही हे कळून येईल. 

* जास्त मौन धारण असेल
एकमेकाशी मोकळेपणाने बोलणे हे हेल्दी नाते असल्याचे संकेत आहे, मात्र  आपली बायको दिवसभर काय करते, कुणाशी बोलते, आॅफिसमध्ये कशा प्रकारे वागते हे सर्व सांगत नसेल तर सावध व्हा. आपल्यातला संवाद केवळ सूचना प्रदान करण्यापुरता राहिला असेल तर वेळेवारी सावध होण्याची गरज आहे.

* ती नेहमी स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करते
ती स्वत:मध्ये बुडालेली असते. स्वत: वेगवेगळ्या कारणांमुळे व्यस्त असते किंवा व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत असते. अशात तिला दोघांच्या नात्याची गरज नाही असे जाणवू लागतं.

* ती अपमानित करते
जर ती निरंतर आपल्या अपमानित करत असेल, टोमणे मारत असेल तर ही वेळ धोक्याची आहे. मत जुळत नसले तरी एकमेकाचा अपमान करणे योग्य नव्हे. प्रेमात सन्मान देणे गरजेचे आहे.                            

* आपल्याला महत्त्व न देणे 
स्वत:साठी काही योजना आखत असताना किंवा स्वत:बद्दल निर्णय घेताना त्यात ती आपल्याला सामील करत नाही अर्थात आपल्याकडे दुर्लक्ष करते याचा अर्थ ती आपल्याला काहीच महत्त्व देत नाही.

* दुर्लक्ष करते
आपल्या वागणुकीकडे, तब्बेतीकडे, आपल्या दिनचर्येकडे ती दुर्लक्ष करते किंवा कोणत्याही बाबतीत ती प्रतिक्रिया करत नसेल किंवा तिला आपल्या नातेवाइकांशी आणि मित्रांशी कुठलेही संबंध ठेवायची इच्छा नसल्यास जाणून घ्या की आपल्यात प्रेम उरलेलं नाही.

* दुसऱ्यांना चांगली वागणूक देते
आपल्याकडे दुर्लक्ष करून ती इतर लोकांना चांगली वागणूक देते याचा अर्थ तिला आपल्यात रस नाही.
 
*आपल्या आयुष्यातील स्पेशल डे ही सामान्य वाटणे

आपला वाढदिवस, लग्नाची वर्षगाठ, आणि इतर काही स्पेशल दिवसही ती खूश नसते. सेलिब्रेट करण्याच्या मूड मध्ये नसून तो दिवस सामान्य दिवसाप्रमाणे घालवू बघते याचा अर्थ उशीर होतोय. सावध व्हा.

हे संकेत मिळत असल्यास वेळेवर सावध होऊन पुन्हा आपले नाते मजबूत करण्याची संधी शोधावी.

source : webdunia 

Also Read : ​Relation : ​आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !
                   : ​Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !

Web Title: Relation 'these' sounds, the wife is not interested in you!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.