Relation: 'This' may be due to love too dangerous for your relationship! | Relation : 'या' कारणाने अति प्रेमही ठरु शकते नात्यासाठी घातक !

-रवींद्र मोरे 
सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांचे प्रेमसंबंध आपणास माहित आहेच. त्यांचे नाते का तुटले याचे मुख्य कारण सांगता येईल ते म्हणजे सलमानचे ऐश्वर्यावर असणारे अति प्रेम. बॉलीवूडमध्ये या व्यतिरिक्त अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचे प्रेमसंबंध फक्त अति प्रेमामुळे संपुष्टात आले. 

प्रेमाचे नाते आणि ब्रेकअप सायकोसिससंबंधीत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यात चकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या लोकांमध्ये लवकर प्रेम करण्याची क्रेझ दिसून येत असून याचा परिणाम तेवढ्याच लवकर एकमेकांपासून लांब होण्याच्या घटना घडत आहेत. या घटना का घडत आहेत, त्याची कारणे शोधण्यासाठी नेमके हे संशोधन करण्यात आले. दोघांमधील गरजेपेक्षा जास्त पे्रम त्यांना एकमेकांपासून लांब होण्यास जबाबदार ठरत असल्याचे या संशोधनात आढळले आहे.
 
जेव्हा एक पार्टनर खूपच प्रेम करतो, तेव्हा तो समोरच्या पार्टनरकडून तशाच प्रेमाची अपेक्षा करतो. जर दुसरा पार्टनर या अपेक्षाला समजू शकला नाही किंवा पूर्ण करू शकला तेव्हा त्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागतात. नेमके याच समस्या भविष्यात नात्यासाठी धोकादायक ठरतात. यात एक पार्टनर असा समजतो की, माझ्या प्रेमाची समोरच्याला काही किंमतच नाही आणि दुसरा असा विचार करतो की, माझ्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण होत आहे. अशी परिस्थिती आल्यावर दोघेही स्वत:साठी काहीतरी नवे शोधणे सुरु करतात.   

* काय आहेत लक्षणे
आपल्या स्वातंत्र्यात कोणी अडसर निर्माण होणे हे कुणालाच आवडत नाही. प्रेम करणे आणि ते जाहिर करणे ही वेगळी गोष्ट आहे, मात्र याला आपण कोणावर बळजबरीने थोपवू शकत नाही. जर आपला पार्टनर आपल्या प्रेमानुसार अपेक्षित प्रतिसाद देत नसेल तर घाई न करता त्याच्याशी संवाद साधून आपले म्हणणे समजवू शकता.

आपल्या नात्याला वेळेनुसार विकसित करण्याचा प्रयत्न करा. बहुतांश आपण वेळेनुसार खूप बदलतो मात्र आपल्या पार्टनरकडच्या आपल्या अपेक्षा पुर्वीसारख्या तशाच असतात. जेव्हा नात्याच्या सुरुवातीला जसे आणि जेवढे प्रेम करतो आजही तसेच वागत असाल आणि तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा करीत असाल तर असे वागणे आपल्या नात्यासाठी घातक समजावे. कारण या अति प्रेमामुळे आपण जेवढे प्रभावित व्हाल तेवढाच आपला पार्टनरदेखील प्रभावित होईल. अशीच परिस्थिती कायम राहिली तर आपला पार्टनर त्रस्त होऊन आपल्यापासून कायमचा लांब जाऊ शकतो. यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि आपले नाते जपून ठेवा. 
Web Title: Relation: 'This' may be due to love too dangerous for your relationship!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.