पार्टनरवर जास्त प्रेम करणंही पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 12:49 PM2018-07-09T12:49:18+5:302018-07-09T12:49:41+5:30

नवरा बायको आणि त्यांची भांडणं म्हणजे न तुटणारी समिकरणंच. मग ती प्रेमळ असोत किंवा गंभीर स्परूपाची असोत. बऱ्याचदा ही भांडणे विकोपाला जातात आणि त्यामुळे नात्यांमध्ये फूट पडते.

reason of divorce in the couples according to the research | पार्टनरवर जास्त प्रेम करणंही पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण!

पार्टनरवर जास्त प्रेम करणंही पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण!

Next

नवरा बायको आणि त्यांची भांडणं म्हणजे न तुटणारी समिकरणंच. मग ती प्रेमळ असोत किंवा गंभीर स्परूपाची असोत. बऱ्याचदा ही भांडणे विकोपाला जातात आणि त्यामुळे नात्यांमध्ये फूट पडते. प्रत्येक नात्यामध्ये वेगवेगळी कारणं आढळून येतात जी लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरतात. परंतु एका अभ्यासातून लग्न मोडण्याचे एक असे कारण समोर आले आहे. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल... या संशोधनानुसार जोडप्यांधील प्रेमच त्यांचे नाते तुटण्याचे आणि घटस्फोट होण्याचे कारण ठरते. 

खरंय... प्रत्येक नातं हे प्रेमावर उभं असतं आणि हेच प्रेम नातं तुटण्याचं कारण असतं. हे ऐकून थोडा धक्का बसणं सहाजिकच आहे. परंतु, इंटरनॅशनल वेबसाइट इंडिपेन्डट डॉट कॉम यूकेमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, लग्नानंतरच्या अनेक वर्षानंतरही नाते तुटण्याचे प्रमुख कारण त्यांचे एकमेकांप्रती असलेले गरजेपेक्षा जास्त प्रेम आहे. संशोधकांनी 13 वर्षे एकूण 168 जोडप्यांचा अभ्यास करून हे जानण्याचा प्रयत्न केला की, लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही नातं तुटण्याची नक्की काय-काय कारणं आहेत. 

संशोधनाच्या अहवालामध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की, जोडप्यांमध्ये एकमेकांबाबत गरजेपेक्षा जास्त प्रेम असणे काही वर्षांनंतर लग्न तुटण्याचे कारण बनत आहे. या प्रकरणी जेव्हा संशोधकांनी काही एक्सपर्ट्शी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सांगितले की,  लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात जोडप्यांमध्ये एकमेकांची अधिक काळजी, अति प्रेम आणि अॅट्रॅक्शन असते. परंतु, हे अॅट्रॅ्क्शन अधिक काळापर्यंत टिकून राहत नाही. 

याव्यतिरिक्त मानसोपचारतज्ज्ञांनी आणखी एक कारण सांगितले ज्यामुळे आपण एखाद्या व्यक्तिच्या स्वभावातील केवळ एका गुणाचा विचार करून त्या व्यक्तिकडे अॅक्ट्रॅक्ट होतो. परंतु अनेकदा आपल्याला आवडलेला तोच गुण त्या व्यक्तिच्या स्वभावातून वेळेनुसार लोप पावतो. त्या एकाच गुणांमुळे आपण इतके प्रभावित होतो की, त्या व्यक्तिंच्या अनेक दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतो.

लग्नाच्या काही वर्षांनंतर जेव्हा आपण आपल्या जोडिदाराकडे पाहतो त्यावेळी आपल्याला पश्चाताप होतो की, ज्या व्यक्तिवर आपण एवढं प्रेम करतो आणि जिच्यासोबत लग्न केले आहे, ती व्यक्ति आधीसारखी राहिलेली नाही. हिच भावना वाढत जाते आणि नाते तुटण्याचे कारण बनतं. 

या संशोधनातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे. त्यांच्यानुसार नाते तुटण्याचे आणखी एक कारण म्हणजे नात्याला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करणं हेही आहे. काही लोकांना स्पष्ट दिसते की त्यांचं नातं आता दुबळं होतं चाललं आहे. परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी हे लोकं अनेक प्रयत्न करत असून जसाजसा वेळ जातो त्यानुसार हे नातं आणखी दुबळं होत जातं.
 

Web Title: reason of divorce in the couples according to the research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.