OMG: These '5' mistakes can remain unmarried all the time! | OMG : या '5' चुकांमुळे राहू शकता आयुष्यभर अविवाहित !

-रवींद्र मोरे 
सध्याची तरुणाई लग्नापासून लांब राहणेच पसंत करते. त्यांच्या मते, लग्न करुन संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले जाते. काही मुली अशाही असतात ज्या लग्न तर करु इच्छितात मात्र घरी लग्नासाठी आलेल्या लोकांना व्यवस्थित उत्तरे न दिल्यामुळे लग्नापासून वंचित राहतात. खूप प्रयत्न करुनही त्यांचे लग्न होत नाही. जर आपणही अशाच समस्यांमध्ये अडकले असाल तर आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या तुम्हाला आयुष्यभर अविवाहित ठेवण्यास कारणीभूत ठरतात. जर आपण वेळेवरच आपल्या या चुका दुरूस्त केल्या तर आपले लग्न वेळेवर होऊ शकते.  
 
* स्वप्नाचा राजा
मुलींना आपल्या स्वप्नाचा राजा हवा असतो. ती आपल्या जीवनसाथीला त्याच रुपात पाहू इच्छिते. मात्र तिला हे समजायला हवे की, प्रत्यक्ष आयुष्य आणि काल्पनिक जगात खूप फरक आहे. हा फरक लक्षात घेऊनच आपल्या जीवनसाथीची निवड करावी.  

* स्वभावात तारतम्य नसणे
जर आपला स्वभाव जास्तच लाजाळू आहे किंवा बडबड्या असेल तर आपणासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. लाजाळू असल्याने आपल्या भावना दुसऱ्याला स्पष्टपणे जाहिर करु शकत नाही आणि जास्त बडबड्या असणेही योग्य नाही. अशा परिस्थितीत लग्न होणे कठीण होते.  

* स्वत:ची काळजी 
काही लोकांच्या मते, लग्नानंतर स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. या कारणाने ते लग्नापासून लांब पळतात. त्यांना एखाद्याची सोबत तर हवी असते मात्र या बंधंनात जुळण्यात त्यांना भीति वाटते.    

* एकाकी राहणे  
बरेच लोकांना एकाकी राहणे आवडते. त्यांना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप आवडत नाही. एवढेच नव्हे तर ते अन्य लोकांसोबत बसणे-उठणेही बंद करतात. ही सवय सुधारली तर लग्न होऊ शकते. 

* स्वातंत्र्य हिरावण्याची भीति 
काही तरुणांना वाटते की रिलेशनमध्ये अडकल्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले जाते. आपल्या मर्जीप्रमाणे आपण काहीच करु शकत नाही, मात्र नाते दोघांच्या समजदारीने निभविले तर सर्व काही शक्य असते.     
Web Title: OMG: These '5' mistakes can remain unmarried all the time!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.