OMG: The present relationships are '4' bad truth! | OMG : सध्याच्या रिलेशनशिपमागील हे आहेत ‘४’ वाईट सत्य !

पुर्वीच्या काळी दोन प्रेमी एकमेकांवरच आयुष्यभर प्रेम करायचे, एकमेकांसोबत राहून किंवा एकमेकांची वाट पाहून जीवन काढायचे. आता मात्र सध्याच्या युगात बदलत्या जीवनशैलीनुसार फक्त एकच गोष्ट पाहावयास मिळते, ती म्हणजे ‘मॉर्डन रिलेशनशिप’, ज्यात काही बंधन नाही, रोख-टोक नाही आणि कोणतीही जबाबदारीही नाही. या रिलेशनशिपमागे सर्वात मोठा हात आहे सोशल मीडियाचा. एक क्षणात येथे संबंध बनतात आणि दुसऱ्या क्षणात तुटतातही. बाहेरहून चकचकीत दिसणारे हे संबंध आतून पोकळ असतात. या रिलेशनशिपमागे असेच काही वाईट सत्य आहेत, जाणून घेऊया त्याबाबत...!

* प्रेम नव्हे वासना 
येथे संबंध प्रेमावर बनत नाही म्हणून ते टिकतही नाही. प्रेमापेक्षा वासनेवर टिकलेले हे संबंध अधिक काळ टिकणे अशक्यच आहे. सेक्सने जुळलेली वन नाइट स्टँड, सेक्स डेट आणि पार्टनर एक्सचेंज करणे मार्डन जगासाठी सामान्य आहे. केवळ सेक्स ओवतीभोवती फिरणारे संबंध कधीच टिकूच शकत नाही.

* सोशल मीडिया
बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमाने काही रिलेशन्स तयार होतात. त्यात टेक्सटिंग, वॉट्स अ‍ॅपवर खरंच भावनिक गप्पा असता की टाइमपास हे कळून येत नाही आणि अशा नात्याला काही आधारच नसल्याने जेवढ्या लवकर संबंध बनतात तेवढ्याच लवकर विस्कटतातही. सोशल मीडियामुळे जुळणाऱ्या संबंधांमध्ये पर्सनल चॅटिंग, एकमेकाच्या स्टेट्सवर आलेले कमेंट्स व अशा काही कारणांमुळे गैरसमज निर्माण होतात आणि अविश्वासाने रिलेशन लवकर तुटते. 

* निष्काळजीपणा 
येथे कोणीच कोणत्याही कृत्यासाठी जबाबदार नाही, की कोणाला कोणाचेही बंधन नाही. त्यातून एकमेकाप्रती संवेदना आणि काळजी तर मुळीच नाही. त्यामुळे अशा संबंधात जुळणार व्यक्ती इगोने भरलेला असतो, तो संबंध टिकवून शकण्यात अक्षम ठरतो.  

* आकर्षक दिसण्याचा प्रयत्न 
पार्टनरला पटविण्यासाठी लोकं आकर्षक दिसण्यासाठी आपल्या लुक्समध्ये भरपूर बदल आणतात. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा कळूनच येत नाही. मन जिंकण्यापेक्षा येथे दिसणं अधिक महत्त्वाचं ठरतं. अधिक मार्डन लुककडे अधिक लोकं आकर्षित होतात, पण जिथे आधारच चुकीचा असेल तिथे संबंध टिकतील तरी कसे?   

Also Read : ​Relation : ​आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !

Web Title: OMG: The present relationships are '4' bad truth!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.