Mother's Day : तुम्हाला माहीत आहे का? कशी झाली या दिवसाची सुरुवात... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 01:03 PM2019-05-12T13:03:10+5:302019-05-12T13:05:34+5:30

आपण अनेकदा एकतो की, आईच्या प्रेमाचं कर्ज कधीच फेडलं जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण कितीही पर्यत्न केले तरि ते कमीच असतात. आई फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर, आपल्याला घडवते आणि एक चांगली व्यक्ती बनवते.

Mothers day 2019 when is mothers day mother day date history of mothers day | Mother's Day : तुम्हाला माहीत आहे का? कशी झाली या दिवसाची सुरुवात... जाणून घ्या!

Mother's Day : तुम्हाला माहीत आहे का? कशी झाली या दिवसाची सुरुवात... जाणून घ्या!

googlenewsNext

आपण अनेकदा एकतो की, आईच्या प्रेमाचं कर्ज कधीच फेडलं जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण कितीही पर्यत्न केले तरि ते कमीच असतात. आई फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर, आपल्याला घडवते आणि एक चांगली व्यक्ती बनवते. आज 'मदर्स डे' आईबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा खास दिवस... खरं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष दिवसाची गरज नाही. पण आईवरील प्रम व्यक्त करण्यासाठी एक कारण म्हणून तुम्ही या दिवसाकडे पाहू शकतो. म्हणूनच दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरामध्ये 'मदर्स डे' साजरा करण्यात येतो. आईच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणारा हा दिवस प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतींनी आणि वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येतो. परंतु भारतामध्ये जास्तीत जास्त देशांमध्ये मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. मदर्स डेच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे आईबाबतच्या भावना व्यक्त करण्यात येतात. 

कशी झाली 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात?

'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. अमेरिकन एक्टिविस्ट एना जार्विस यांचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. त्यांनी स्वतः लग्न केलं नव्हतं. कालांतराने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईवर असलेलं आपलं प्रमे व्यक्त करण्यासाठी त्यांनीच या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये 'मदर्स डे' साजरा करण्यात येऊ लागला. 

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारीच का साजरा करतात 'मदर्स डे'?

9 मे 1914 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता. ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा करण्यात येईल. तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला. 

कसा साजरा करण्यात येतो 'मदर्स डे'?

दरम्यान, आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खआस दिवसाची गरज नसते. परंतु, 'मदर्स डे'च्या दिवशी आईवरील प्रेम व्यक्त करण्याचा खस दिवस आहे. यादिवशी तिला स्पेशल फिल करून देण्यासाठी तुम्हीही खास प्लॅन केला असेलच. त्याऐवजी तुम्ही तिला खास गिफ्टही देऊ शकता. 

Web Title: Mothers day 2019 when is mothers day mother day date history of mothers day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.