जास्तीत जास्त पुरुष आपल्या जुन्या अफेअर्सबाबत खोटं सांगतात - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:03 PM2018-10-08T12:03:10+5:302018-10-08T12:03:36+5:30

अनेकदा विवाहित जोडपी हे दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांना त्यांच्या पार्टनरचे भूतकाळात किती अफेअर होते, कितीदाही शारीरिक संबंध ठेवले असतील तर या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही.

Most men tell lie about their past affairs and sex life says study | जास्तीत जास्त पुरुष आपल्या जुन्या अफेअर्सबाबत खोटं सांगतात - रिसर्च 

जास्तीत जास्त पुरुष आपल्या जुन्या अफेअर्सबाबत खोटं सांगतात - रिसर्च 

Next

अनेकदा विवाहित जोडपी हे दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांना त्यांच्या पार्टनरचे भूतकाळात किती अफेअर होते, कितीदाही शारीरिक संबंध ठेवले असतील तर या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. खरंतर हे असं काही नसतं. मुळात जास्तीत जास्ती लोकांना या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. समाजात आजही शारीरिक संबंधांकडे संकुचितपणे पाहिलं जातं. अनेकजण या विषयावर बोलणेही टाळतात. 

अशातच एका शोधातून समोर आले आहे की, जास्तीत जास्त पुरुष हे आपल्या जुन्या अफेअरबाबत आणि शारीरिक संबंधांबाबत खोट्या गोष्टी सांगताना दिसतात आणि याबाबत गोष्टी ते फार तिखटमीठ लावून सांगतात. हा अभ्यास यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लॅसगोमध्ये करण्यात आला आहे. 

यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लॅसगोच्या अभ्यासकांनी महिलांवर आणि पुरुषांवर हा अभ्यास केला. त्यांच्यानुसार जितकेही एक्स पार्टनर असण्याचा दावा केला गेला, त्यात फरक बघायला मिळाला. या अभ्यासातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. 

अभ्यासकांच्या टिमने नॅशनल सर्वे ऑफ सेक्शुअल अॅटिट्यूड अॅंड लाइफस्टाइलच्या डेटाचा अभ्यास केला. या सर्वेमध्ये यूकेचे १५ हजार १६२ लोक सहभागी केले होते. या सर्व माहितीचं विश्लेषण केल्यानंतर समोर आले की, सर्वेमध्ये सहभागी महिलांचे सरासरी ७ एक्स पार्टनर्स होते तर पुरुषांचे सरासरी १४ एक्स पार्टनर्स होते. 

महिला आणि पुरुषांच्या एक्स पार्टनर्सच्या संख्येत दुप्पट अंतर होतं. त्यानंतर हा फरक असण्याचं कारण शोधण्यात आलं. यादरम्यान याचा खुलासा झाला की, पुरुष हे आपल्या अफेअर्सबाबत आणि शारीरिक संबंध किती वेळा ठेवले याबाबत खोटं सांगतात आणि एक्स पार्टनरची संख्या वाढवून सांगतात. 

दुसऱ्या कारणांचा विचार करायचा तर महिलांनी बरोबर आकडेवारी यासाठी सांगितली, कारण त्यांना एक्स पार्टनर्स लक्षात राहतात. पुरुष या बाबींकडे फार सहजपणे बघतात आणि यावर अनिश्चित उत्तरे देतात. सोबतच याचं हेही कारण आहे की, महिला पुरुषांच्या तुलनेत कॅज्युअल रिलेशनशिपसाठी सहजासहजी तयार होत नाही.  

Web Title: Most men tell lie about their past affairs and sex life says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.