Kiss Day : किस केल्याने केवळ आनंदच नाही तर हे फायदेही होतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:15 AM2019-02-13T10:15:08+5:302019-02-13T10:15:50+5:30

आज व्हॅलेंटाइन वीकचा सातवा दिवस साजरा केला जाणार आहे. आज लोक किस डे साजरा करतात.

Kiss Day: Know the amazing health benefits of the kiss | Kiss Day : किस केल्याने केवळ आनंदच नाही तर हे फायदेही होतात!

Kiss Day : किस केल्याने केवळ आनंदच नाही तर हे फायदेही होतात!

Next

आज व्हॅलेंटाइन वीकचा सातवा दिवस साजरा केला जाणार आहे. उद्या जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाईल. आज लोक किस डे साजरा करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला किस करून त्यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं जातं. किस केवळ गर्लफ्रेन्डलाच केलं जातं किंवा करावं असं नाही. किस तुम्ही आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी यांनाही करून तुमच्या भावना व्यक्त करू शकता. किस आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचं एक उत्तम माध्यम मानलं जातं. याने भावना व्यक्त तर होतातच सोबतच अनेक फायदेही होतात. चला जाणून घेऊ किस करण्याचे हेल्थ बेनिफिट्स...

१) जेव्हा दोन लोक किंवा कपल्स किस करतात तेव्हा त्यांच्या शरीरात कोर्टिजोल नावाचं रसायनचं प्रमाण कमी होतं आणि सिरोटोनिन हार्मोन्स रिलीज होता. हे सिरोटोनिन हार्मोन्स रिलीज झाल्याने व्यक्तीचा तणाव कमी होतो. तसेच दोघांनाही आनंद आणि सकारात्मक ऊर्जाचे जाणीव होते. 

२) जेव्हाही कपल्स एकमेकांना किस करतात तेव्हा त्यांच्या शरीरातील इम्यून सिस्टीमही मजबूत होते. ज्यामुळे शरीराला होणारे वेगवेगळे इन्फेक्शन कमी करण्यास मदत मिळते. 

३) सामान्यपणे एक व्यक्ती पार्टनरला प्रेम करण्यासाठी किस करतो, पण हे फार लोकांना माहीत नाही की, किस केल्याने तुमच्यातील एक्स्ट्रा कॅलरी वेगाने बर्न होतात. म्हणजे किस एकप्रकारे एक व्यायामच आहे. वेगवेगळ्या शोधातून हे समोर आले आहे की, १ मिनिटांपर्यंत किस केल्याने व्यक्तीच्या २ ते ३ कॅलरी बर्न बोतात. जेव्हा कपल एक लॉन्ग आणि इमोशनल किस करतात तेव्हा ५ पेक्षा जास्त कॅलरी बर्न होतात.  

४) किस केल्‍याने चेहरा उजळायला मदत होते. किस केल्‍याने चेह-यावरील मास पेशी मजबुत होतात आणि गाल मुलायम आणि कोमल होतात यामुळे चेहरा सुंदर दिसतो. किस केल्यामुळे चेह-यात रक्त प्रवाह वाढतो आणि यामुळे तुमच्या चेह-यावर एक वेगळीच चमक पहायला मिळते.

५) ज्यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला ‘किस’ करता त्यावेळी रोमान्स करण्यासोबतच तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्तीही एका प्रकारे वाढवित असतात. किसिंग केल्यामुळे सिटोमेगॅलो व्हायरस विरोधात प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. सिटोमेगॅलोव्हायरस नावाचा विषाणू हा महिलांसाठी गरोदरपणाच्या काळात धोकादायक ठरण्याची शक्यता असते.

६) किस केल्याने शरीरात एड्रोनिल नावाचे हार्मोन रिलीज होता. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो आणि याचा फायदा हृदयाला होतो. हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होते. 

७) जेव्हा कपल्स एकमेकांना किस करतात तेव्हा दोघांनाही केवळ आनंद मिळतो असे नाही तर दोघांचा एकमेकांवरील विश्वास वाढतो. दोघांची जवळीक वाढते. म्हणजे किस करून नात्यातील दुरावा कमी केला जाऊ शकतो. 

Web Title: Kiss Day: Know the amazing health benefits of the kiss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.