'या' गोष्टीमुळे तुम्ही ठरता इंटेलिजन्ट, रिसर्चमधून खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:41 PM2019-01-31T13:41:23+5:302019-01-31T13:51:44+5:30

आधुनिक जीवनशैलीमध्ये जास्तीत जास्त तरूण-तरूणींना रात्री उशीरापर्यंत पार्टी करणे, बाहेर फिरणे, सिनेमे बघणे याची जास्त क्रेझ असते.

Intelligent people have this quality | 'या' गोष्टीमुळे तुम्ही ठरता इंटेलिजन्ट, रिसर्चमधून खुलासा!

'या' गोष्टीमुळे तुम्ही ठरता इंटेलिजन्ट, रिसर्चमधून खुलासा!

(Image Credit : truththeory.com)

आधुनिक जीवनशैलीमध्ये जास्तीत जास्त तरूण-तरूणींना रात्री उशीरापर्यंत पार्टी करणे, बाहेर फिरणे, सिनेमे बघणे याची जास्त क्रेझ असते. पण ज्या लोकांना एकटं राहणं पसंत असतं त्यांना अ‍ॅंटी-सोशल असा शिक्का लावला जातो. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.  

या रिसर्चनुसार, जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत पार्टी करण्याऐवजी घरी राहून एखादं चांगलं पुस्तक वाचण्याला महत्त्व देत असाल किंवा एकट्यात वेळ घालवत असाल तर ही तुम्ही इंटेलिजन्ट असण्याची ओळख आहे. सिंगापूरच्या मॅनेजमेंट यूनिव्हर्सिटी आणि लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिकच्या अभ्यासकांनुसार, इंटेलिजन्ट लोक हे फिरण्याऐवजी स्वत:सोबत वेळ घालवण्याला अधिक महत्त्व देतात. 

(Image Credit : The Independent)

या रिसर्चच्या अभ्यासकांनी १८ ते २८ वयोगटातील जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेतले होते. यातून अभ्यासकांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, हे लोक किती लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहतात आणि मित्रांसोबत किती फिरतात. त्यासोबतच किती लोक जीवनात संतुष्ट आहेत, याचीही माहिती अभ्यासकांनी मिळवली. 

या रिसर्चच्या निष्कर्षातून हे समोर आले की, जेव्हा लोक कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहतात, ते इतरांच्या तुलनेत जास्त आनंदी राहतात. तेच यातील अनेकांना केवळ खास लोकांना भेटूनच आनंद झाला. 

(Image Credit : Plentifun)

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी 'द सवाना थेअरी ऑफ हॅपीनेस' च्या निष्कर्षांना आधार मानले होते. या थेअरीनुसार, जीवनात एका व्यक्तीची संतुष्टी केवळ वर्तमानात होणाऱ्या घटनांवर आधारित नसते. तर आपले पूर्वज अशा स्थितीत कसे प्रतिक्रिया देत होते, या गोष्टीनेही प्रभावित होते. 

थेअरीनुसार, आपल्या पूर्वजांना दुसऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे पसंत होते आणि ते त्यांच्या आयुष्यात कुणासोबत वेळ घालवण्याला महत्त्व देत होते. ठिक त्याचप्रमाणे सध्याच्या काळातही काही लोकांना एकटं राहणं पसंत नसतं आणि असे लोक कुणाच्या ना कुणाच्या सोबतीचा शोध घेत असतात. 

पण याच्या विरूद्ध मानसोपचारतज्ज्ञांचं असं मत आहे की, इंटेलिजन्ट लोक या गोष्टीत विश्वात ठेवत नाहीत. उलट असे लोक कुणासोबत असतील तर जास्त आनंदी राहतात. तुम्हालाही जर एकटं राहण्याची भीती वाटत नसेल आणि तुम्हाला स्वत:सोबत वेळ घालवण्यास जास्त आनंद मिळत असेल तर समजा की, तुम्ही इंटेलिजन्ट आहात. असं हा रिसर्च सांगतो.

Web Title: Intelligent people have this quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.