‘पडू’ द्या की मुलांना, हे पडणंच त्याला आयुष्यात उभं राहायला शिकवील!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:45 PM2017-08-16T17:45:12+5:302017-08-16T18:17:20+5:30

निर्णय आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारीच घेता आली नाही, तर कसं मोठं होणार आपलं मूल?

Help your teens to take proper decisons.. | ‘पडू’ द्या की मुलांना, हे पडणंच त्याला आयुष्यात उभं राहायला शिकवील!..

‘पडू’ द्या की मुलांना, हे पडणंच त्याला आयुष्यात उभं राहायला शिकवील!..

Next
ठळक मुद्देपडण्यातला आनंद घेऊ द्या मुलांना.स्वातंत्र्य द्या, मोकळीक द्या आणि जबाबदारी घ्यायलाही शिकवा.मुलाचा निर्णय नसेल पटत, पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देणार की नाही?मुलांच्या पायात पाय घालण्यापेक्षा द्या त्यंना प्रामाणिक साथ.

- मयूर पठाडे

आपली मुलं.. आपण सुरुवातीपासून त्यांना तळहातावरच्या फोडासारखं जपतो. ती असतातच आपली जीव की प्राण.. त्यांना काही झालं की तीळतीळ तुटतोच आपला जीव.. स्वत:लाच अपराधी असल्यासारखं वाटायला लागतं..
पण एक लक्षात येतंय आपल्या? आपली मुलं एवढी मोठी झाली.. हो, मला माहीत आहे, मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्यासाठी ती लहानच असतात. अगदी कितीही ती मोठी होऊ देत.. पण आईबापापुढे त्यांचं मोठेपण खुजं असतं.. पण एवढी मोठी होऊनही ती आपला स्वत:चा निर्णय स्वत: का घेऊ शकत नाहीत? का त्यांना कुठल्याही निर्णयासाठी आपल्या आईवडिलांवर, शिक्षकांवर, वडिलधाºयांवर कायम अवलंबून राहावं लागतं?
मुलांना का घेता येत नाहीत स्वत:चे निर्णय?
१- याचं कारणही आपल्या मुलांवर असलेल्या आपल्या अतीव प्रेमावर आहे. आपण त्यांना जीव लावतो, पण त्यांच्यावर जबाबदारी टाकायला आपणच घाबरतो.
२- जबाबदारी घेण्याची सवयच नसलेली मुलं कुठलाही निर्णय घेताना मग कायमच कचरतात. करू की नको.. जाऊ की नको.. अशी काचकुच त्यामुळे कायमच त्यांच्या मनाला घेरुन बसलेली असते.
३- मुलांनी आपले निर्णय स्वत:चे स्वत: घ्यावेत यासाठी त्यांना तशी मोकळीक दिली पाहिजे. निर्णयांची जबाबदारी घ्यायलाही शिकवलं पाहिजे. त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे.
४- एक गोष्ट मात्र पालक म्हणून आपण कायम लक्षात घेतली पाहिजे. आपलं मूल जे काही सांगतंय, मोठं होण्याचा प्रयत्न करतंय, त्यात तुमची प्रामाणिक साथ असली पाहिजे. मध्येच त्याला अडवून त्याच्या पायात खोडा घालणं आपण थांबवलं पाहिजे.
५- मुलाचं बोलण मध्येच थांबवून, आपलंच घोडं पुढे दामटण्यापेक्षा शांतपणे आधी त्याचं ऐकून घ्या. अगदीच वाटलं, तर त्याचे बरेवाईट परिणाम त्याला समजावून सांगा, पण त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा. ही पहिली पायरी आहे, बघा, आत्मविश्वासाचं बिजारोपण त्याच्यात होतं की नाही?
६- आपलं नातं किती निकोप आणि निरोगी राहील याचा असोशीनं प्रयत्न करा. अशा वातावरणातच निर्भयपणे काही करण्याची आणि परिणामांची जबाबदारी घेण्याची वृत्तीही जोपासली जाऊ शकते.
७- ओव्हर रिअ‍ॅक्ट होणं टाळा. शांतपणे मुलाची बाजू समजून घ्या. तुम्हाला कदाचित नसेल पटत त्याचं म्हणणं, पण त्याच्या बोलण्याचा हक्क तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत.. हे लक्षात असू द्या.
८- स्वत:चे निर्णय स्वत: कसे घ्यायचे, त्याचं स्कील तुमच्या अनुभवातून तुम्ही जरूर शिकवा, पण पाहू द्या की त्यालाही एकदा पडून. कळू द्या त्याला, त्या पडण्यातही आनंद आणि यशाची पहिली पायरी दडलेली असते ते!...

Web Title: Help your teens to take proper decisons..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.