कमी खर्चात अशी एन्जॉय करा पहिली डेट, गर्लफ्रेन्ड होणार तुमची फॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:36 PM2018-10-10T12:36:58+5:302018-10-10T12:47:38+5:30

अलिकडे डेटिंग ही सामान्य बाब झाली आहे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींला डेटला घेऊन जाण्याचा ट्रेन्ड वाढला आहे.

Happy dating in low budget couples relationship | कमी खर्चात अशी एन्जॉय करा पहिली डेट, गर्लफ्रेन्ड होणार तुमची फॅन!

कमी खर्चात अशी एन्जॉय करा पहिली डेट, गर्लफ्रेन्ड होणार तुमची फॅन!

Next

अलिकडे डेटिंग ही सामान्य बाब झाली आहे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींला डेटला घेऊन जाण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. एक मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेमात असतात आणि एकमेकांना चांगले ओळखायला लागतात तेव्हा डेटिंगचा विषय निघतो. पण अनेकजण हे पैशांच्या अडचणीमुळे आपली डेट कॅन्सल करतात आणि आपल्या पार्टनरला याबाबत आधीच सांगून आपला चार्म कमी करतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला कमी पैशात डेट एन्जॉय करण्याच्या काही खास टीप्स देणार आहोत. 

गेट-टुगेदर

तुम्ही तुमच्या घरीच किंवा मित्रांसोबत मिळून एक छोटसं गेट-टुगेदर प्लॅन करु शकता. याने तुमच्या पार्टनरला तुम्हाला आणखीन जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल. तसेच सोप्या आणि स्वस्त उपायांनीही तुम्ही डेटिंगदरम्यान विंडो शॉपिंगची मजा घेऊ शकता. तसेच घरीच चांगले पदार्थ तयार करुनही कन्डल लाईट डिनरही प्लॅन करु शकता. 

रोमॅंटिक जागा निवडा

तुम्ही तुमची डेट रोमॅंटिक करण्यासाठी निसर्गाचा आधार घेऊ शकता. म्हणजे बोटिंग करु शकता, स्केटिंग करु शकता, फिशिंग करु शकता. अशा जागेची निवड करा जिथे तुम्हाला निसर्गाचा अधिक आनंद घेता येईल. तेव्हाच तुमचं डेटिंग सक्सेस होऊ शकेल.

कुठेही एन्जॉय करा डेट

डेटिंगला केवळ दिखाव्याची किंवा बनावटीची गरज नसते. उलट जसे आहात तसे कुठेही भेटू शकता. तुम्हाला डेटिंगसाठी वेगळी जागा महत्त्वाची नाही तर तुमची सोबत महत्त्वाची आहे. केवळ मॉल किंवा हॉटेलने तुमची डेट चांगली होईल असे नाही. 

चांगल्या गप्पा करा

हे गरजेचे नाही की, डेटला तुम्ही एखाद्या महागड्या हॉटेलमध्येच गेले पाहिजे. डेटिंगसाठी तुम्ही कोणत्याही स्वस्त ढाब्यावर किंवा स्वस्त रेस्टॉरंटमध्ये कॉफी किंवा चहाचा आनंद घेऊ शकता. तसाही हॉटेलमध्ये जाऊ खाणे हा डेटिंगचा मुळ उद्देश नाहीये. दोघे एकमेकांना जाणून घेऊ शकाल हा डेटिंगचा मुख्य उद्देश आहे. अशावेळी तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही कसे बोलता हेही तितकच महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या पार्टनरला आनंद देऊ शकतात. 

फास्ट फूडनेही वाढेल मजा

आपल्या पार्टनरला डेटला घेऊन जाताना आपल्या खिशावर नजर टाकण्याऐवजी डोक्याने विचार करा आणि असा प्लॅन करा की तुमचा पार्टनरही खूष होईल आणि तुमचा खर्चही कमी होईल. तुम्ही लॉंग ड्राइव्हला जाऊ शकता किंवा लॉंग वॉकला जाऊ शकता. रस्त्यात पाणीपुरी, भेल पुरी खाऊ शकता.

Web Title: Happy dating in low budget couples relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.