Handsome children come to the mind of the girls, 'this' idea! | Handsome मुलांना पाहून मुलींच्या मनात येतात ‘हे’ विचार !

चित्रपटातील हॅँडसम हिरोचे आकर्षण तरुणींना नसेल असे म्हणणे चुकीचे ठरेल. एखाद्या तरुणीला एखादा हॅँडसम हिरो आवडत असेल तर ती त्याचा आकर्षक लूकसोबत त्याच्या लाइफस्टाइलबाबतही नेहमी विचारात मग्न असते. विशेषत: त्या हिरोप्रमाणेच दिसणारा एखादा हॅँडसम तरुण जर तिच्या नजरेत असेल तर त्याच्या आकर्षक लूकसोबतच त्याच्या चांगल्या गोष्टी आणि तो जर नेहमी आनंदी राहत असेल तर ती फटक्यात अशा मुलाला आपले मन देऊन बसते. 
मात्र या गोष्टी ती कधीही जाहिर होऊ देत नाही. जेव्हाही तो हॅँडसम तरुण तिच्यासमोर येतो तर तिच्या मनात कोणते विचार येतात, याबाबत जाणून घेऊया.
 
* त्याच्याशी मैत्री कशी होईल 
त्या हॅँडसम तरुणाशी आपली मैत्री कशी होईल? या विचारात ती नेहमी असते. ती त्याच्याशी मैत्री करण्यासाठी नेहमी धडपड करत असते. 

* त्याच्याशी गप्पा मारण्याची इच्छा होणे 
कोणत्याही हॅँडसम तरुणाला पाहून मुली काहीही प्रतिक्रिया देत नसतील, मात्र तिच्या मनात त्याच्याशी गप्पा मारण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी जर त्या तरुणाने त्या मुलीला अटेंशन दिले तर तिला अजून चांगले वाटते. 

* अविवाहित असावा 
हॅँडसम तरुणाला पाहून मुलींच्या मनात नेहमी हा विचार येतो की, तो अविवाहित असावा, म्हणजेच सिंगल असावा.   

* नेहमी नजरेच्या समोर असावा 
एखादा हॅँडसम तरुण आॅफिसमध्ये भेटलाच तर तो नेहमी आपल्या नजरेसमोरच असावा असा विचार मुलींच्या मनात येतो शिवाय जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ती त्याला एकटक पाहत राहते, मात्र हे ती कुणालांही समजू देत नाही. 

source : aajtak 

Also Read :  ​Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?
Web Title: Handsome children come to the mind of the girls, 'this' idea!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.