Growing Craye of 'Chocolate Day' in the spring | तरुणाईत ‘चॉकलेट डे’ची वाढती क्रेझ
तरुणाईत ‘चॉकलेट डे’ची वाढती क्रेझ

मुंबई : ‘व्हॅलेंटाइन वीक’चे जोरदार सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे सध्या सर्वांवर प्रेमाचा रंग चढला आहे. प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाºया चॉकलेट्सला शुक्रवारी साजºया होणाºया ‘चॉकलेटची डे’बद्दल कमालीची उत्सुकता आहे. व्हॅलेंटाइन सप्ताहाचा तिसरा दिवस असणारा ‘चॉकलेट डे’ साजरा होणार आहे.
या ‘चॉकलेट डे’च्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे चॉकलेट्स विक्रीस आले आहेत. त्याची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. नवेनवे प्रयोग यात करण्यात आले असून प्रेमाचा संदेशही यात देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भातील विविध प्रकारच्या भेटवस्तूही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. छोटे चॉकलेट, कॅडबरी, घरगुती विविध आकारांच्या चॉकलेट्सचा यात समावेश करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे व्हॅलेंटाइन वीकमधल्या डेज्चे ‘व्हर्च्युअल’ सेलिब्रेशनही होताना दिसते आहे. शिवाय, आपल्या मित्र-मैत्रिणींनी दिलेले गिफ्ट्स, चॉकलेट्सचे फोटोस काढूनही व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरही अपलोड करणाºया नेटीझन्सची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
>‘चॉकलेट विथ मेसेज’
तरुणाईला आकर्षित करण्यास विक्रेत्यांनी वेगवेगळे प्रयोग केले असून यात ‘फॉर यू’ या संदेशाची अधिकच क्रेझ दिसून येतेय. चॉकलेट फ्रेम, मेसेज बॉटल हा नवा प्रकारही यात पाहायला मिळत आहे. फ्रेममध्ये चॉकलेट ठेवण्यात आले असून नंतर फ्रेमचा फोटोसाठी उपयोग होणार आहे.
>आकर्षक पॅकिंग
प्लॅस्टिकचे बॉक्स विविध आकारांत तयार करून त्यात चॉकलेट भरण्यात आले आहेत. यात हार्ट शेप, टेडी, फ्लॉवर, फोल्डिंग बॉक्ससारखे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच नेटच्या पोटलीमध्ये नेटच्या बॉक्सला सजविण्यात आले आहे. यात मणी वर्क करून गोटा लेसद्वारे सजविण्यात आले आहे. तसेच बास्केटही यात खास आकर्षण ठरले आहे.


Web Title: Growing Craye of 'Chocolate Day' in the spring
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.