Friendship Day 2018: खऱ्या आणि स्वार्थी मित्रांमध्ये असतात हे ७ फरक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 11:34 AM2018-08-03T11:34:53+5:302018-08-05T11:13:01+5:30

ज्या दिवसाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते तो 'फ्रेन्डशिप डे' रविवारी साजरा होणार आहे. मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं.

Friendship Day 2018: 7 differences between true and selfish friends! | Friendship Day 2018: खऱ्या आणि स्वार्थी मित्रांमध्ये असतात हे ७ फरक!

Friendship Day 2018: खऱ्या आणि स्वार्थी मित्रांमध्ये असतात हे ७ फरक!

Next

(Image Credit: www.eharmony.co.uk)

मुंबई : ज्या दिवसाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते तो 'फ्रेन्डशिप डे' रविवारी साजरा होणार आहे. मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. पण आता टेक्नॉलॉजीच्या या युगात मैत्रीची परिभाषा जरा बदलली की काय असं वाटायला लागलं आहे. अनेकांना खऱ्या आणि खोट्या मित्रात फरक असतो हे माहितच नसतं. चला जाणून घेऊ यातील फरक....

१) तुमचं काम कसंही असो, नवीन काम सुरू करणे असो, कोणता निर्णय घ्यायचा असेल तर तुमचा खरा मित्र तुमच्यासोबत नेहमी उभा राहतो. तो तुमची साथ कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. पण स्वार्थी मित्र तुमची खिल्ली उडवत असतात. तुमच्या अपयशाची खिल्ली उडवत असतात. 

२) जर तुमची एखादी गोष्ट तुमच्या मित्राला आवडली नाही तर तो तुमच्याशी बोलतो. तुमच्या चुकांवर तो पांघरुनही घालतो. पण काही लोक हे तुमच्या मागे वाइट बोलतात. पण जो व्यक्ती केवळ तुमच्या सुखातच नाही तर दु:खातही सहभागी असतो तोच तुमचा खरा मित्र असतो. 

3) खरे मित्र भलेही तुमच्यासोबत काम करत नसतीलही, तुमच्या जवळ नसतीलही किंवा ते तुमच्यापासून कुठेतरी दूर असले तरी ते तुमच्यासाठी वेळ काढतात. 

४) खऱ्या मित्राला तुमच्या चांगल्या-वाईट सवयींबाबत सगळंकाही माहीत असतं. त्याला हे माहीत असतं की, तुमच्या कशा परिस्थितीत कसे वागणार आहात. पण जे लोक तुम्हाला मुद्दाम भडकवण्याचे काम करतात ते तुमचे खरे मित्र नसतात. 

५) तुमच्या खऱ्या मित्राला तुमच्या सगळ्याच सीक्रेट्सबाबत माहीत असतं. हे सीक्रेट तो कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाही किंवा कुणालाही सांगत नाही. पण स्वार्थी लोकांच्या पोटात काही पचत नाही. 

६) जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असता तेव्हा तुमचा खरा मित्र तुमच्यासोबत असतो. तुम्हाला योग्य प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत असतो. इतर लोक केवळ आनंदाच्या वेळेसच तुमच्यासोबत असतात. 

७) खरे मित्र हे तुम्हाला कधीही चुकीचा सल्ला देत नाहीत. चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला तुम्हाला देत असतात. पण स्वार्थी लोक हे कधीही तुम्हाला योग्य सल्ला देणार नाहीत.
 

Web Title: Friendship Day 2018: 7 differences between true and selfish friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.