Every girlfriends hide these things from your boyfriend! | प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडपासून लपविते ‘या’ गोष्टी !

नाते म्हटले म्हणजे त्यात विश्वास असणे खूपच महत्त्वाचे असते. विश्वासावरच नाते टिकते असेही म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र बऱ्याचदा नात्यात दूरावा येतो तो एका पार्टनरकडून काही तरी लपविणे म्हणजे खोटे बोलणे आदी गोष्टींमुळे. 
जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून काहीही लपवत नाही किंवा ती खोट बोलत नाही तर तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडपासून काही ना काही लपवते. जाणून घेऊ ते कोणते खोटे आहे जे गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडशी लपवतात.

* अन्य मुलींची प्रशंसा गर्लफ्रेंडला आवडत नाही
'द रिचेस्ट' मॅगझिनमध्ये छापलेल्या एका संशोधनानुसार मुली रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त खोट बोलतात. जर तुम्ही त्यांच्यासमोर एखाद्या दुसरी मुलीची तारीफ केली तर त्या तुमच्या समोर नक्की बोलतील की त्यांना काही फरक पडत नाही, पण वेळ आल्यावर त्या नक्कीच या गोष्टीसाठी तुमच्यावर राग काढतील.

* मेकअप करत नाही
मुली नेहमी म्हणतात की त्यांना मेकअप करणे पसंत नाही पण या रिसर्चमध्ये असे आढळून आले की मुली सर्वात जास्त वेळ सजण्यात लावतात. त्यांना प्रत्येक वेळी सुंदर दिसायचे असते ज्यासाठी त्या आपल्या मेकअपवर पूर्ण लक्ष देतात.


* बॉयफ्रेंडची मौज-मस्ती पसंत नसते
मुलींना हे अजिबात आवडत नाही की त्यांचा बॉयफ्रेंड आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत असेल आणि त्यांच्यासोबत मौज-मस्ती करत असेल. अशात ती म्हणून देते की जा अजून मित्रांसोबत मस्ती कर पण वास्तविकता अशी असते की तिला देखील त्यांच्यासोबत मस्ती करायचे असते किंवा मुलाने फक्त तिच्यासोबतच राहावे असे तिला वाटत असते.

* मोकळीकता
मुली भले मुलांना सांगत असतील की ती त्यांना स्पेस देण्यास तयार आहे. पण त्यांची अशी इच्छा असते की त्यांच्या बॉयफ्रेंडनी वेळो वेळी त्यांच्याशी बोलावे किंवा चॅट करावे.

* नाराज झाल्यावर काय म्हणतात मुली
जेव्हा कधीही मुलीने म्हटले की, 'मला काही माहीत नाही तुला जे करायचे ते कर' तर समजून घ्या की तिला राग आला आहे आणि तिची इच्छा असते की तिच्या सर्व अटी मुलाने मान्य केल्या पाहिजे. 
Web Title: Every girlfriends hide these things from your boyfriend!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.