नवरा बायकोच्या उंचीत दडलंय सुखी संसाराचं गुपित; जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:05 PM2018-12-19T12:05:52+5:302018-12-19T12:08:52+5:30

तुला कसा मुलगा हवाय गं?, असा प्रश्न कोणत्याही मुलीला विचारा. 'Tall, Dark and Handsome' असंच उत्तर हमखास ऐकायला मिळेल. एखाद दुसरा अपवाद सोडला तर अनेक जणींना आवडणारे हिरोदेखील अगदी याच श्रेणीतले असतात.

Do short wives and tall husbands have the happiest marriages? | नवरा बायकोच्या उंचीत दडलंय सुखी संसाराचं गुपित; जाणून घ्या कसं?

नवरा बायकोच्या उंचीत दडलंय सुखी संसाराचं गुपित; जाणून घ्या कसं?

1. नात्याची 'उंची'
तुला कसा मुलगा हवाय गं?, असा प्रश्न कोणत्याही मुलीला विचारा. 'Tall, Dark and Handsome' असंच उत्तर हमखास ऐकायला मिळेल. एखाद दुसरा अपवाद सोडला तर अनेक जणींना आवडणारे हिरोदेखील अगदी याच श्रेणीतले असतात. पण या 'Tall, Dark and Handsome' मापदंडाची व्याख्या बऱ्याच जणींना सांगताही येत नाही. त्यामुळे मला कसाही मुलगा किंवा कशीही मुलगी लाइफ पार्टनर म्हणून चालेल, असे म्हणणारे फारच क्वचित सापडतात. मान्य करा किंवा करू नका, पण वास्तविक जीवनातही पार्टनर शोधताना बहुतांश मुलं आणि मुली शारीरिक गुणधर्म निखरुन आणि पारखून पाहूनच कोणासोबत लग्नगाठ बांधायची हे ठरवतात. नात्यातील उंची मोजण्यापेक्षा विशेषतः पार्टनरची शारीरिक उंची, असणं आणि दिसणं या गोष्टींनाच अधिक महत्त्व दिलं जाते. 

2. शारीरिक उंची महत्त्वाची ?
लाइफ पार्टनर शोधताना तशी अनेक मापदंड आधीच ठरवलेली असतात. त्यात घरातील माणसं आणि मुलगा-मुलीची स्वतंत्र मापदंड, हीदेखील निराळीच समस्या. पण लाइफ पार्टनर निवडताना 'उंची' हे एक महत्त्वाचे परिमाण म्हणून का पाहिले जाते? याचा कधी विचार केलाय. नसेल केला तर करायला हरकत नाही. कारण कमी उंचीची पत्नी आणि उंचपुरा पती यांच्यातील वैवाहिक आयुष्य अधिक सुखाचे असते, ही अजब-गजब बाब संशोधनाद्वारे सिद्ध करण्यात आली आहे. प्राध्यापक Kitae Sohn यांनी यासंदर्भात  संशोधन करुन काही निष्कर्ष मांडली आहेत. Kitae Sohn हे साऊथ कोरियाची राजधानी सोल येथील Konkuk University मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्या मुली त्यांच्याहून बऱ्याच उंच मुलासोबत लग्न करतात, त्यांचे वैवाहिक आयुष्य अधिक आनंदी होण्याची शक्यता असते, असे निरीक्षण त्यांनी आपल्या संशोधनात नोंदवले आहे. 

3.  'उंची'ची राज की बात
बुटकी बायको आणि उंच नवरा यांच्यातील वैवाहिक आयुष्य प्रचंड आनंदी असण्याची शक्यता असते, ही बाब सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी तब्बल 7 हजार 850 महिलांचा अभ्यास केला. पती-पत्नीच्या उंचीमध्ये फारसा फरक नसलेल्या जोडप्यांच्या तुलनेत ज्या महिलांनी आपल्याहून अधिक उंच असलेल्या पुरुषाबरोबर लग्न केले आहे, त्यांचे वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदी असल्याचे संशोधकांना आढळून आले. दरम्यान, उंच पुरुषासोबत लग्न का केले?, या प्रश्नाचे ठोस उत्तर या महिला देऊ शकल्या नाहीत. काहींनी केवळ उंच पुरुषांकडे आकर्षित झाल्यामुळे लग्न केल्याचे मान्य केले. 

Sohn यांच्या संशोधनानुसार, उंच पुरुष जास्त ताकदवान असतात आणि आपलं चांगल्या पद्धतीने संरक्षण करू शकतात, हा समज महिलांच्या लग्नाबाबतच्या निर्णयावर परिणाम करू शकतो. अर्थात, 18 वर्षांच्या संसारानंतर त्याची किंवा तिची उंची कमी किंवा अधिक ही बाब अजिबातच महत्त्वाची उरत नाही. 7,850 महिलांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले.

4. उंची आणि संरक्षणाच्या भावनेचा संबंध
Rice University चे David Ruth आणि University of North Texas चे Ellen Rossetti यांनी केलेल्या संशोधानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी जोडीदाराची उंची ही महत्त्वाची बाब असते. विशेषतः स्त्रीत्व, स्त्रीपण आणि स्व-रक्षण या अर्थानं महिलांसाठी जोडीदाराची 'शारीरिक उंची' अतिशय महत्त्वाचा घटक असतो. 

5. महिलांचे काय होते म्हणणं?
आयुष्यात उंच पुरुषाच्या असण्याबाबत महिलांना मतं विचारली असता, संशोधकांना काही मजेशीर उत्तरं मिळाली. एका महिलेनं सांगितले की, ''उंच पार्टनरमुळे एक स्त्री म्हणून मला नाजूक आणि सुरक्षित असल्याचे जाणवते''. तर दुसऱ्या महिलेनं म्हटलं की, ''माझ्या हक्काच्या माणसाच्या डोळ्यात नजर खाली वाकवून पाहणं, हा विचारदेखील फार विचित्र वाटतो''.

6. उंच पुरुष जास्त हुशार असतात का?
हुशार पुरुषांकडे तरुणी लगेचच आकर्षित होतात, असे म्हटले जाते. शारीरिक उंची आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का?  हे पडताळून पाहण्यासाठी ब्रिटनमधील काही संशोधकांनीही अभ्यास केला. तर बुद्धिमत्ता आणि उंची या दोहोंमध्ये थेट परस्परसंबंध असल्याचे निरीक्षण या संशोधकानी नोंदवले आहे.

7. ज्याची त्याची चॉईस 
संशोधकांनी मांडलेल्या निकषांचा विचार केला असता, जोडीदार म्हणून उंच पुरुष  निवडण्याचा प्रत्येक महिलेला हक्क आहे. उंचीचे प्रमाण हे शक्तीसोबतही जोडले गेलेले आहे. जर आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहिला तर, अन्नाच्या शोधासाठी बहुतांश वेळा पुरुष मंडळीच घराबाहेर पडत. शिवाय, आपल्या कुटुंबीयांचंही संरक्षण करत असत.  त्यामुळे आपल्या कर्तव्यांची अंमलबजावणी बलवान पुरुष अधिक चांगल्या पद्धतीनं करतात, असे मानले गेले आहे.  

8. बदलत्या भूमिका 
बदलत्या काळानुसार, पती-पत्नींच्या आयुष्यात निभावलेल्या जाणाऱ्या भूमिकाही बदलत जात आहेत. आताच्या आधुनिक आणि प्रगत युगात कुटुंबातील कमावता सदस्य म्हणून केवळ पुरुषांकडेच पाहिले जात नाही. तर संसाराचा गाडा नीट ट्रॅकवर चालवण्यासाठी स्त्रियादेखील उत्तमरित्या हातभार लावतात. खायला काळ भुईला भार होण्याऐवजी दर्जेदार शिक्षण घेऊन स्त्रियादेखील आता कुटुंबाच्या कमावत्या सदस्यांच्या यादीत आल्या आहेत. चुल-मुल आणि घर सांभाळत स्वतःसोबत संपूर्ण कुटुंबाचीही त्या प्रगती करताहेत.
वैवाहिक आयुष्य आनंदी असण्यासाठी प्राध्यापक Sohn यांनी मांडलेल्या निष्कर्षामध्ये एखादी स्त्री स्व-रक्षणासाठी उंच पुरुष जोडीदार म्हणून निवडत नसेल किंवा एखाद्या पुरुषालाही घरातील काम करण्यात आनंद मिळत असल्यास, याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Web Title: Do short wives and tall husbands have the happiest marriages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.