पार्टनर शोधून देण्यात Tinder पेक्षा दोन पाऊल पुढे आहे हे अ‍ॅप, DNA टेस्टशिवाय दाखवत नाहीत फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:44 PM2019-02-07T12:44:05+5:302019-02-07T12:46:21+5:30

लोक प्रेमाचा आणि जोडीदाराचा शोध आता डेटिंग आणि साइट्स आणि अ‍ॅप्सवर घेत आहेत. Tinder चं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच.

This dating app matches people based by their DNA compatibility | पार्टनर शोधून देण्यात Tinder पेक्षा दोन पाऊल पुढे आहे हे अ‍ॅप, DNA टेस्टशिवाय दाखवत नाहीत फोटो!

पार्टनर शोधून देण्यात Tinder पेक्षा दोन पाऊल पुढे आहे हे अ‍ॅप, DNA टेस्टशिवाय दाखवत नाहीत फोटो!

Next

जग फारच बदललं आहे. लोक प्रेमाचा आणि जोडीदाराचा शोध आता डेटिंग आणि साइट्स आणि अ‍ॅप्सवर घेत आहेत. Tinder चं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच. पण आता एक अ‍ॅप असंही आलं आहे ज्यावर अनोख्या पद्धतीने तुमच्यासाठी जोडीदार शोधला जातो. तर Hater हे अ‍ॅपही चांगलंच लोकप्रिय आहे.  हे अ‍ॅप दोन लोकांची तेव्हाच भेट करून देतं, जेव्हा दोघांनाही कोणत्याही एकाच गोष्टींची चीड असेल. आता या डेटिंग अ‍ॅपच्या विश्वात आणखी एका अ‍ॅपने एन्ट्री घेतली आहे. यावर तुमच्यासाठी सायंटिफिक पद्धतीने प्रेम शोधलं जातं. 

काय आहे अ‍ॅपचं नाव?

या अ‍ॅपचं नाव Pheramor असं आहे. यांच्याकडून दोन लोकांची केमिकल कंपेटिबिलिटी म्हणजेच अनुरूपता पाहून प्रोफाइल मॅच केलं जातं. यासाठी यूजर्सचा डीएनए डेटा घेतला जातो आणि योग्य जोडीदार शोधला जातो. ही कंपनी साधारण २१०० रूपये घेऊन तुम्हाला DNA Kit पाठवते. ही किटच्या माध्यमातून तुम्हाला डीएनए डेटा पाठवावा लागतो. 

प्रत्येक दिवशी तीन मॅच रिक्वेस्ट

Pheramor तुम्ही पाठवलेल्या सॅंम्पलचं विश्लेषण करतं आणि ११ आणखी अशाच डीएनएचं चाचणी करतात. ज्या एकमेकांप्रति होऊ शकतात. त्यानंतर केमिकल कम्पेटिबिलिटी तपासली जाते. नंतर यूजरला त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेले तीन मॅच प्रोफाइल पाठवतात. 

विरूद्ध आकर्षणाचा नियम आणि हे अ‍ॅप

या अ‍ॅपचे सीईओ डॉ. ब्रिटनी बरॅटो म्हणाले की, 'आम्ही यूजर्सकडून मिळालेले सॅम्पल लॅबमध्ये पाठवतो. गालांच्या पेशीद्वारे डीएनए आणि एंटीजेन जीन्स किंवा एचएलए जीन्सची घेतलं जातं. हे जीन्स एखाद्याप्रति आकर्षित होण्याचे प्रमुख कारण असतात. अनेक शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, एचएलए जीन्स वेगवेगळे असतील तर लोक एकमेकांप्रति आकर्षित होतात. यानेच अपोझिट अट्रॅक्शनचा नियम बनतो'.

भारतात कधी सेवा?

या अ‍ॅपच्या माध्यमातून यूजर्स त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल लिंक करू शकता. प्रोफाइल मॅच झाल्यावर कंपनीकडून ब्लर केलेले काही फोटो पाठवले जातात. या कंपनीची सुरूवात टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये करण्यात आली. आता हे अ‍ॅप अमेरिकेत लॉन्च केलं जाणार आहे. अपेक्षा आहे की, भारतातही हे अ‍ॅप लवकरच येईल.  

Web Title: This dating app matches people based by their DNA compatibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.