घराला 'हटके ग्रीन लूक' देण्यासाठी 'या' पर्यायांचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:37 AM2018-08-30T11:37:02+5:302018-08-30T11:37:53+5:30

कोणत्याही दिवसांत आपल्या घरात चैतन्य नांदावे, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा, यासाठी आपल्या घराची स्वच्छता, सजावट याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते.

Real estate: decorate your home to make it cool and green | घराला 'हटके ग्रीन लूक' देण्यासाठी 'या' पर्यायांचा विचार करा

घराला 'हटके ग्रीन लूक' देण्यासाठी 'या' पर्यायांचा विचार करा

Next

मुंबई- एसीच्या कृत्रिम थंड वातावरणापेक्षा नैसर्गिक गारवा अधिक हवाहवासा वाटतो. अशा अल्हाददायक वातावरणात आपले घर असेल तर... ही कल्पनाच किती छान वाटते ना... पण ही कल्पना आपण प्रत्यक्षात साकार करू शकतो कोणत्याही ऋतूत येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी खास असावा, सुसह्य असावा, अशी आपली इच्छा असते. हे दिवस चांगले जाण्यासाठी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. कोणत्याही दिवसांत आपल्या घरात चैतन्य नांदावे, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा, यासाठी आपल्या घराची स्वच्छता, सजावट याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. मुलांच्या सुट्टीच्या निमित्ताने आपण नातेवाईकांच्या घराला भेटी देत असतो. अशा वेळी एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यास त्यांना तुमच्या घरात उल्हसित वाटले पाहिजे. 

घराला हटके लूक देण्यासाठी कशी कराल सजावट?:

1) घराच्या सुंदर वातावरण निर्मितीसाठी फुलझाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून गोंडे, गुलाब अशी फुलझाडे लावण्यास प्राधान्य द्या. तुळस व कडुनिंब यासुद्धा औषधी वनस्पती असल्याने त्यांचे एक विशेष महत्त्व आहे. सध्या गरमीचा मोसम चालू असल्याने घर किंवा फ्लॅटभोवती अशा प्रकारच्या आरोग्यदायी औषधी वनस्पती  लावा.

2) घराला हिरवागार लूक देण्यासाठी खिडक्या किंवा बाल्कनीत शोभेच्या टपोऱ्या झाडांच्या कुंड्या सजवा, तसेच पाना-फुलांची छान आरास करा. यामध्ये छोटे इलेक्ट्रिक दिवे लावल्यास एक खास लूक मिळेल. 

3) काही पारंपरिक सणांबरोबर रांगोळीचे नाते घट्ट असते. म्हणून एकाद्या खास सणाला नेहमीची रांगोळी न काढता, वेगवेगळ्या रंगीत फुलांचा व पाकळ्यांचा वापर करून रांगोळी काढा आणि त्यात रंग भरा. फुलांच्या सुगंध व यात ठेवलेला मंद दिवा, यामुळे तुमची रांगोळी आकर्षक तर दिसेलच, पण ही सुगंधाने दरवळणारी रांगोळी छान वातावरण निर्मिती होईल.

4) कुंड्यांमध्ये लावलेल्या रोपांवर पाण्याच्या स्प्रेचा शिडकावा जरूर करा. त्यामुळे ती टपेरी व फ्रेश तर दिसतीलच, पण पाहणाºयाच्या नजरेला छान थंडावाही मिळेल.

5) भिंतींना ग्रीन लूक देण्यासाठी तुम्ही भिंतीवर वेली-फुलांचा वापर करून छान सजवू शकता. या वेली पाहणाºयाची नजर सुखावून टाकतील. 

6) घराची सजावट पाना-फुलांनी केल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मंद जळणारा दिवा अवश्य ठेवा. त्यामुळे तुमच्या सजावटीला छान लूक प्राप्त होईल.

7) बाल्कनीतील कुंड्यांचाही तुम्ही सजावटीसाठी वापर करू शकता. या कुंड्यांची आकर्षकरीत्या मांडणी करून एक रीच लूक देता येईल. 

Web Title: Real estate: decorate your home to make it cool and green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.