रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:25 PM2018-06-04T16:25:33+5:302018-06-04T16:29:56+5:30

रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबावअंतर्गत जिल्ह्यातील ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या धरणांमध्ये २५ मे २०१८ अखेर ८७.७९ दशलक्ष घनमीटर अर्थात ३७.८० टक्के पाणीसाठा होता.

Water scarcity in Ratnagiri district, impact on over one hundred taps | रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणाम

रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणाम

Next
ठळक मुद्देजिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणामतापमानवाढीने केले पाण्याचे बाष्पीभवन, पाणीसाठ्याची घसरगुंडी

रत्नागिरी : रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबावअंतर्गत जिल्ह्यातील ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या धरणांमध्ये २५ मे २०१८ अखेर ८७.७९ दशलक्ष घनमीटर अर्थात ३७.८० टक्के पाणीसाठा होता.

तापमानवाढीमुळे पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणीसाठ्यामध्ये ही घसरण झाली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक नळपाणी योजनांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.

लघु पाटबंधारेबरोबरच जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या मध्यम प्रकल्पांमध्ये ११५.७६ दशलक्ष घनमीटर अर्थात ६३.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या तीन मध्यम प्रकल्पांच्या तुलनेत ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ ३७.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

४५ लघु पाटबंधारे प्रकल्प व ३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून २५ मेअखेर ४९.०६ टक्के पाणीसाठा होता. या एकूण ४८ धरण प्रकल्पांमध्ये २०३.५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील लघु पाटबंधारे धरणांमधील पाण्याची पातळी अधिकच खालावली आहे.

एप्रिलमध्ये आणखी दोन धरणे आटली असून, गतवर्षीच्या एप्रिल महिन्यातील धरणसाठ्याच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात धरणातील पाणीसाठा सुमारे १० टक्क्यानी खालावला.

यावर्षीच्या मार्च महिन्यात ४८ धरणांमध्ये असलेला २६१.७०पैकी ३४.३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा महिनाभरात घटला आहे. मे अखेरीस या पाणीसाठ्यात आणखी ६ टक्के घट होऊन पाणीसाठा ४९.०६ टक्क्यांवर आला आहे.

लघु प्रकल्पांपैकी ओझर आणि तळवडे ही दोन लघु पाटबंधारे धरणे मार्च महिन्यातच कोरडी झाली होती. मार्चमध्ये अल्पसाठा असलेल्या कोंड्ये व केळंबा धरणांमध्ये एप्रिल महिन्यात पाण्याचा खडखडाट झाला.

लघु प्रकल्पांपैकी एकूण चार धरणे पूर्णपणे आटली आहेत. पन्हाळे, गव्हाणे, निवे, फणसवाडी व टांगर या पाच लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा असून, ती आटण्याच्या मार्गावर आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरू झाली. मे महिन्यात टंचाई स्थिती गंभीर आहे.

भोळवली, शिरसाडी, आवाशी, टांगर, पंचनदी, शिरवली, कोंडिवली, शेलारवाडी, फणसवाडी, कळवंडे, मोरवणे, असुर्डे, साखरपा, शिपोशी, व्हेळ, तेलेवाडी, कडवई, निवे, गडगडी, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, दिवाळवाडी या लघु प्रकल्पांमधील साठा ५० टक्केपेक्षा कमी झाला आहे. काही धरणांमध्ये तर १० ते २० टक्केपर्यंतच साठा असल्याने समस्या गंभीर बनली आहे.

३७ टक्क्यांवर साठा

जिल्ह्यातील पाटबंधारेच्या ४५ लघु व ३ मध्यम अशा एकूण ४८ धरणांमधील पाणीसाठा फेबु्रवारी महिन्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक होता. मार्च महिन्यात धरणसाठा ६३ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यानंतर १६ एप्रिलपर्यंत धरण साठ्यामध्ये आणखी ५४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

२५ मे २०१८ या दिवसापर्यंत या धरणांमधील साठ्यात आणखी ६ टक्के घसरण होऊन साठा ४९ टक्क्यांवर आला आहे. परंतु ४८पैकी ४५ लघु पाटबंधारे धरणप्रकल्पांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला असून, ३७.८० टक्क्यांवर आला आहे. मान्सूनचे आगमन वेळेत झाले तर पाणी समस्येवर मात होऊ शकेल.
 

Web Title: Water scarcity in Ratnagiri district, impact on over one hundred taps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.