ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर मानसकोंड येथे अपघात क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढलाक्लीनर जखमी, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय दाखल ट्रक चालक पवार वाडी ता.पुरंदर जि. पुणे येथील

देवरुख :  मुंबई- गोवा महामार्गावर मानसकोंड येथे ट्रक पन्नास फुट दरीत जावुन झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. मृत चालकाचे नाव श्रीपती ग्यानबा पवार असे असुन (वय ५०) पवार वाडी ता.पुरंदर जि. पुणे येथील आहे. हा अपघात बुधवारी रात्री १0.३0 च्या दरम्यान झाला.
 
घटना स्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार चालक पवार हे आपल्या ताब्यातील  ट्रक (टऌ 12 ङढ 3924 ) जयगड हुन पुण्याकडे गहु घेवुन जात होते. यावेळी ट्रक वरचा ताबा सुटल्याने मुंबई- गोवा महामार्गावर मानसकोंड येथील ५0 फुट दरीत जावुन ट्रक कोसळला.

या अपघातावेळी चालक पवार ट्रक मध्ये अडले होते. त्यांने बाहेर काढण्यात आले, मात्र ते जागीच ठार झाले होते, तर क्लीनर विजय बाळासो घोडके (वय ३० रा. मंगळवेढा जि. सोलापुर) हा जखमी झाला आहे. त्याला नरेंद्राचार्य महाराजसंस्थानच्या रुग्णवाहीकेचे चालक प्रसाद सप्रे यांनी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय दाखल केले. रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला.