अतिक्रमण हटावच्या चेंडूची टोलवाटोलवीच, रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:21 PM2019-06-17T16:21:38+5:302019-06-17T16:22:39+5:30

काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगारून अतिक्रमणे हटवतील व शहर सुशोभित करतील, ही आशा आता नागरिकांनी सोडूनच द्यावी काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.

Tricolor of the encroachment retreat, Ratnagiri Municipal Council's control | अतिक्रमण हटावच्या चेंडूची टोलवाटोलवीच, रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार

अतिक्रमण हटावच्या चेंडूची टोलवाटोलवीच, रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार

Next
ठळक मुद्देअतिक्रमण हटावच्या चेंडूची टोलवाटोलवीच, रत्नागिरी नगर परिषदेचा कारभारराजकीय आशीर्वादामुळे शहरात खोके संस्कृती

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगारून अतिक्रमणे हटवतील व शहर सुशोभित करतील, ही आशा आता नागरिकांनी सोडूनच द्यावी काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या काही दशकांमध्ये अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, पदपथावरील खोक्यांची अतिक्रमणे सातत्याने वाढत आहेत. नगर परिषदेत सत्तेत येताना सर्वजण रत्नागिरी शहर सुंदर, सुशोभित करण्याचे वचन देतात. मात्र, सत्ता कोणाचीही असो, खोके संस्कृतीचे विस्तारीकरण सुरूच आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत सध्या खोक्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र, त्यामुळे शहरात बकालपणा वाढत आहे, याची फिकीर कोणालाही नाही.

रत्नागिरी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे ही गेल्या ४ दशकांपासून आहेत. नगर परिषदेत अतिक्रमणविरोधी पथकही कार्यरत आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी नगर परिषदेकडे स्वतंत्र वाहनही आहे. सध्या या अतिक्रमण विरोधी पथकाला धडाकेबाज अधिकारीही लाभला आहे. मात्र, असे असतानाही या पथकातील कर्मचाऱ्यांचे हात राजकीय दबावाने बांधल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, नगर परिषद प्रशासन या राजकीय दबावातून कधीतरी बाहेर पडतील ही अपेक्षा रत्नागिरीकरांनी ठेवूच नये काय, असा सवाल केला जात आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारी (१४ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर व अन्य विरोधी सदस्यांनी अतिक्रमणांचा विषय आक्रमकतेने मांडला व शहरात तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याची मागणी केली. त्याचवेळी काही नगरसेवक, पुढारी यांचे बेकायदा खोक्यांना अभय असल्याचा आरोपही झाला. यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांच्या सहमतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

यानंतर मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी यासाठी सर्व नगरसेवक व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे मोहिमेचा चेंडू टोलवला जात असल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु, याआधीच्या मोहिमांवेळी कारवाई करण्यास गेलेल्या पथकावर राजकीय दबाव आणला गेला होता. त्यामुळेच मुख्याधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. मात्र, सर्व नगरसेवक सभागृहात असताना स्वतंत्र बैठकीची गरज नाही, असे सांगून अतिक्रमण हटाव मोहिमेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. मात्र, राजकीय दबाव येऊन पुन्हा या मोहिमेचा फज्जा उडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

बेकायदेशीर टपऱ्या, खोके
रत्नागिरी शहराच्या साळवी स्टॉप या प्रवेशद्वारापासून ते मांडवी व बाजारपेठेतील अनेक भागांमध्ये जेथे जागा मिळेल तेथे खोके, टपऱ्या बेकायदेशीररित्या उभारण्यात आले आहेत. मटक्यासाठी लागणारे खोके मात्र बाजाराकडे पाठ करून उभे आहेत. शहरातील पदपथ विक्रेत्यांनी व्यापले असून, त्यांचा पादचाºयांसाठी उपयोगच होत नाही. होर्डिंग्ज व खोक्यांमुळे बकालपणा वाढला आहे.

Web Title: Tricolor of the encroachment retreat, Ratnagiri Municipal Council's control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.