शिवसेनेत भाऊबंदकी, आघाडीत अजून तिढाच, इच्छुक वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:28 PM2019-06-19T16:28:43+5:302019-06-19T16:30:10+5:30

विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी उमेदवारीवरून विधानसभेची तिकीटबारी आतापासूनच हलू लागली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिकत्त्वाचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्याने भाऊबंदकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आघाडीतील दोन्ही पक्ष पुढे झाले आहेत.

Shiv Sena's brother-in-law, alliance in the front, still more inclined - grew more interested in politics | शिवसेनेत भाऊबंदकी, आघाडीत अजून तिढाच, इच्छुक वाढले

शिवसेनेत भाऊबंदकी, आघाडीत अजून तिढाच, इच्छुक वाढले

Next
ठळक मुद्देशिवसेनेत भाऊबंदकी, आघाडीत अजून तिढाचइच्छुक वाढले, शह-काटशहचे राजकारण ऐरणीवर

मनोज मुळये 

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी उमेदवारीवरून विधानसभेची तिकीटबारी आतापासूनच हलू लागली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिकत्त्वाचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्याने भाऊबंदकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आघाडीतील दोन्ही पक्ष पुढे झाले आहेत.

रिफायनरी आंदोलकांचे नेते अशोक वालम यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यानच उमेदवारीचे बिगुल वाजवले होते आणि स्वाभिमानही आता विधानसभेच्या उंबरठ्यावर दाखल होऊ पाहत आहे. त्यामुळे निवडणुकांआधी राजापुरात उमेदवारीच अधिक चुरशीची झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राजापूर विधानसभा मतदार संघात मोठे यश मिळवले आहे. रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेविरोधात रान उठवण्यात आले असले तरीही शिवसेनेने मतांमध्ये मारलेली मुसंडी पाहून यावेळी सेनेतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. गणपतराव कदम यांचा अपवाद वगळता काँग्रेसला अनेक वर्षात या मतदारसंघात यश मिळालेले नाही.

शिवसेनेत इच्छुक अधिक

लोकसभेत मिळालेल्या यशामुळे शिवसेनेत इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या संपर्कामुळे शिवसेनेला लोकसभेत या मतदारसंघात यश मिळाले. मात्र, आता शिवसेनेतूनच चंद्रप्रकाश नकाशे, पांडुरंग उपळकर, प्रकाश कुवळेकर हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पुढे आले आहे. स्थानिक उमेदवार हा मुद्दा आताही पुढे आला आहे. भाजपच्या राजश्री विश्वासराव याही गेली दोन-तीन वर्षे या मतदारसंघात सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्याही दावा करणार का, असा प्रश्न आहे.

काँग्रेस आघाडीत मोका कुणाला?

आजवरच्या जागा वाटपात राजापूरची जागा काँग्रेसलाच मिळत होती. राष्ट्रवादीने अनेक वर्षे या मतदार संघात लक्ष दिले नव्हते. मात्र, अजित यशवंतराव यांनी सातत्याने संपर्क ठेवून या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाची अपेक्षा केली जात आहे. काँग्रेसकडून विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांचे नाव चर्चेत आहे. राजापूरचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे खेचण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सद्यस्थितीत अजित यशवंतराव आणि खलिफे हे दोन्ही बलवान उमेदवार आहेत. त्यामुळे संधी कोणाला मिळणार, हा प्रश्न आहे.

अशोक वालम यांचेही रिंगणात उतरण्याचे स्वप्न

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याचे आंदोलन वाढवण्यात सर्वात मोठा पुढाकार अशोक वालम यांचा होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे बिगुल वाजवले आहे. जो रिफायनरीला विरोध करण्यासाठी सहकार्य करेल, त्या पक्षाला आपण पाठिंबा देऊ, असे त्यांनी जाहीर केले होते.

शिवसेनेने त्यांना आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र, आता ते स्वत:च इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षात इच्छुक अधिक असल्याने त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. ते स्वाभिमान पक्षाकडून उभे राहतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, त्यांचा प्रमुख भर हा केवळ रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित गावांपुरताच राहण्याची शक्यता आहे.

स्वाभिमान एन्ट्री करणार

पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेल्या स्वाभिमान पक्षाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानला निवडक ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांना राजापूरमध्ये उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात स्वाभिमानला मतांसाठी खूप प्रयत्न करावे लागलील

Web Title: Shiv Sena's brother-in-law, alliance in the front, still more inclined - grew more interested in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.