नदीचे पाणी ओसरू लागले, जगबुडी पुलावरुन धिम्या गतीने वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 02:37 PM2019-07-11T14:37:36+5:302019-07-11T14:53:24+5:30

जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुलावरचे पाणी ओसरले. त्यानंतर या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.

Riding from Jagbudi bridge, rains in the village | नदीचे पाणी ओसरू लागले, जगबुडी पुलावरुन धिम्या गतीने वाहतूक सुरू

नदीचे पाणी ओसरू लागले, जगबुडी पुलावरुन धिम्या गतीने वाहतूक सुरू

Next
ठळक मुद्देजगबुडी पुलावरुन वाहतूक सुरूखेडला पावसाचा दणका

खेड : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्यात पुन्हा पावसाने धुडगूस घालायला सुरुवात केली असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी रात्री ८ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुलावरचे पाणी ओसरले. त्यानंतर या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.

गेल्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात धुवाँधार पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. खेडची जगबुडी व चिपळूणची वाशिष्ठी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकही बंद होती.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली होती. जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळी जगबुडी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती.

जगबुडीचे पाणी जुन्या पुलाला पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांना देताच जाधव यांनी तत्काळ जगबुडी पुलाला भेट दिली.

दरम्यान, खेड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मदत ग्रुपच्या सदस्यांच्या मदतीने रात्री ८ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. पूल बंद झाल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या.

जगबुडी पुलावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे जगबुडी नदीचे पाणी ओसरू लागल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या मार्गावर सध्या धिम्या गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

Web Title: Riding from Jagbudi bridge, rains in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.