रत्नागिरी : खेडमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी, केवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:19 PM2018-05-16T17:19:14+5:302018-05-16T17:19:14+5:30

खेड तालुक्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.

Ratnagiri: In the village, the vasectomy rate is low, only 50 percent achieved the goal | रत्नागिरी : खेडमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी, केवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य

रत्नागिरी : खेडमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी, केवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य

Next
ठळक मुद्देखेडमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण कमीकेवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य

दस्तुरी : खेड तालुक्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.

आरोग्य विभागाने दिलेले उद्दिष्ट तालुक्याला कधीही गाठता आलेले नाही. सन २०१७-१८ या वर्षात दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. नसबंदीला पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत फार कमी असल्याने उद्दिष्टाला एकप्रकारे धक्काच बसला आहे.

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पुरुष आणि महिलांच्या शस्त्रक्रिया वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत़, यात पुरुष आणि महिलांना भत्ता देण्यात येतो़ यात पुरुषांना एक हजार 300 रुपये तर त्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणाऱ्यांना 200 रुपये देण्यात येतात़.

दारिद्रय़रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या पुरुषांना एक हजार 350 रुपये देण्यात येतात़.  पुरुषांनी या नसबंदी केल्यास त्यांना आरोग्य विभाग जादा रुपये देत असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी पुरुषांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यापेक्षा महिलांना दिली जाणारी रक्कम त्या मानाने कमी असूनही दर वर्षी साधारण सात हजार महिलांच्या शस्त्रक्रिया क

Web Title: Ratnagiri: In the village, the vasectomy rate is low, only 50 percent achieved the goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.