रत्नागिरी : मच्छीमार समुदाय तटरक्षक दलाचे डोळे, कान, भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 04:06 PM2018-06-06T16:06:36+5:302018-06-06T16:06:36+5:30

मच्छीमार समुदाय हा तटरक्षक दलासाठी डोळे आणि कान यांचे काम करतो. कारण मासेमारी करीत असताना समुद्रात एखादी संशयास्पद हलचाल आढळताच मच्छीमार बांधव तटरक्षक दलाच्या गस्ती नौका किंवा पोलिसांना त्वरित सूचित करतात. त्यामुळे मच्छीमार समुदायाला जीवनाचे संरक्षण होण्यासाठी समुदाय संवाद कार्यक्रम हाती घेतला जात असल्याची माहिती तटरक्षक दल, रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी दिली.

Ratnagiri: Two-wheeler rally coordinated by the Coast Guard's eyes, ears and Indian Coast Guard | रत्नागिरी : मच्छीमार समुदाय तटरक्षक दलाचे डोळे, कान, भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने दुचाकी रॅली

रत्नागिरी : मच्छीमार समुदाय तटरक्षक दलाचे डोळे, कान, भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने दुचाकी रॅली

Next
ठळक मुद्दे मच्छीमार समुदाय तटरक्षक दलाचे डोळे, कान भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने दुचाकी रॅली

दापोली : मच्छीमार समुदाय हा तटरक्षक दलासाठी डोळे आणि कान यांचे काम करतो. कारण मासेमारी करीत असताना समुद्रात एखादी संशयास्पद हलचाल आढळताच मच्छीमार बांधव तटरक्षक दलाच्या गस्ती नौका किंवा पोलिसांना त्वरित सूचित करतात. त्यामुळे मच्छीमार समुदायाला जीवनाचे संरक्षण होण्यासाठी समुदाय संवाद कार्यक्रम हाती घेतला जात असल्याची माहिती तटरक्षक दल, रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी दिली.

तटरक्षक दलाच्या समन्वयाने मच्छीमारांच्या संरक्षणासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली दापोली तालुक्यातील दाभोळ येथे आली होती. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तटरक्षक दल, पोलीस, ओएनजीएस, कस्टम, फिशरीज या विभागाच्या एकूण ३६ जवानांचा व कर्मचाऱ्यांचा ताफा ९ दिवसांच्या मुंबई ते गोवा प्रवासासाठी मुंबईतून निघाला आहे.

मुंबईहून गोव्याकडे निघालेला जवानांनाचा हा ताफा दाभोळ येथे सकाळी दाखल झाला. तत्पूर्वीच तटरक्षक दल रत्नागिरीने स्थानिक पोलिस व महसूल विभागाच्या मदतीने ग्राम पंचायत हॉल, दाभोळ येथे समुदाय संवाद कार्यक्रमाचे सर्व आयोजन केले होते. येथे तटरक्षक दल रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस आर पाटील, पोलीस निरीक्षक लाड, पोलीस निरीक्षक तायडे, फिशरीज विभागाचे सहायक आयुक्त साळुंखे, सीआयएसएफचे उपसमादेशक इंदोरीया उपस्थित होते.

माहिती पत्रकांचे वितरण

तटरक्षक दलामध्ये नाविक आणि अधिकाऱ्यांच्या भरतीसंबंधी माहिती जसे शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, परीक्षांचे वेळापत्रक व परीक्षा पध्दत याबद्दल मच्छीमारांना माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांची मुले तटरक्षक दलात येण्यासाठी प्रेरित होतील. यासंबंधीची माहिती पत्रकेही वाटण्यात आली.

स्वच्छ सागरी पर्यावरण

स्वच्छ व सुरक्षित सागरी पर्यावरण आणि सागरी सुरक्षा याबाबत मच्छीमार बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा समुदाय संवाद आयोजित करण्यात येणार असून, या रॅलीचे नेतृत्व तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडंट अजय दहिया यांच्याकडे आहे.

प्रात्यक्षिक सादरीकरण

सध्याच्या काळात देशाला समुद्रामार्गे भेडसावणारे सुरक्षिततेचे प्रश्न, शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण, जीवन संरक्षक उपकरणे, संकट कालीन इशारे, प्रथमोपचार इत्यादी बाबींची माहिती देण्यासाठी तटरक्षक दलातर्फे वारंवार असे समुदाय संवाद कार्यक्रम राबबिले जातात. त्यानंतर मच्छिमारांना सुरक्षा उपकरणे कशी वापरावी, संकट काळी इशारे कसे द्यावेत, संरक्षक दलास माहिती कशी द्यावी यांबद्दल प्रात्यक्षिके करून दाखवली गेली.

जागृती निर्माण करणे

मच्छीमारांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच सागरी सुरक्षिततेची जबाबदारी निभावणारे तटरक्षक दल, सागरी पोलीस, कस्टम, फिशरीज अशा विविध संस्था व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये संघ भावना, कामात सुसूत्रता, परस्पर संपर्क व विश्वास यांचा विकास साधला जातो.

Web Title: Ratnagiri: Two-wheeler rally coordinated by the Coast Guard's eyes, ears and Indian Coast Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.