रत्नागिरी : नव्या तलाठी सजांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा, प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:46 PM2017-12-29T15:46:18+5:302017-12-29T15:49:02+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात नव्या सजांसाठी तलाठ्यांची पदे भरली जाणार असल्याने सध्या अतिरिक्त कामाचा बोजा असलेल्या तलाठ्यांचा हा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

Ratnagiri: Open the path for the recruitment of new talathi earrings, complete the process | रत्नागिरी : नव्या तलाठी सजांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा, प्रक्रिया पूर्ण

रत्नागिरी : नव्या तलाठी सजांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा, प्रक्रिया पूर्ण

Next
ठळक मुद्देवर्षभरात १०३ सजांमध्ये होणार पदभरतीला प्रारंभतीन टप्प्यात शासन स्तरावर तलाठी पदभरती प्रक्रिया सुरू होणार

रत्नागिरी : जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात नव्या सजांसाठी तलाठ्यांची पदे भरली जाणार असल्याने सध्या अतिरिक्त कामाचा बोजा असलेल्या तलाठ्यांचा हा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

ग्रामस्तरावर तलाठी हा महत्त्वाचा घटक असूनही तलाठ्यांची पदे मुळातच कमी आहेत. त्यातच अनेक कामांची जबाबदारी एकाच तलाठ्यांवर टाकली जात असल्याने त्याच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नवीन तलाठी व मंडल अधिकारी पदांची पुनर्रचना करावी, अशी मागणी गेल्या ३२ वर्षांपासून होत होती.

अखेर या मागणीची दखल शासनस्तरावर घेण्यात आली. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने नवीन पद निर्मिती आवश्यकतेबाबत अभ्यास करण्यासाठी व तलाठ्यांचे कामाचे वाढलेले स्वरूप पाहून पदनिर्मितीकरिता नवीन सूत्र ठरवण्यासाठी व त्यानुसार राज्यामध्ये किती पदे निर्माण करणे आवश्यक आहे, याचा अहवाल देण्यासाठी विभागीय आयुक्त (नागपूर) अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने अहवाल शासनाकडे सादर केला होता.

या अहवालाचे निरीक्षण करण्याकरिता महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीनेही अहवाल शासनाकडे सादर केला. शासनाने हा अहवाल स्वीकारून या पदनिर्मितीला मंजुरी दिली. त्यानुसार राज्यात ३१६५ तलाठी पदे निर्मित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैकी कोकण विभागातील ७४४ तलाठी सजांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १०६ सजांचा समावेश आहे.

नव्याने तलाठी सजा तसेच महसूल मंडलांची निर्मिती होणार आहे. यासाठी आता प्रशासनस्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील कोणकोणत्या उपविभागात किंवा तालुक्यात तलाठी सजांची वाढ होईल, याची निश्चिती करण्यात आली होती तसेच आवश्यक सजांची पुनर्रचना किंवा फोड करावी लागेल, हे ठरवण्यासाठी तालुक्यावार समिती स्थापना करण्यात आली.


या प्रक्रियेनंतर प्रत्येक उपविभागात निर्माण करावयाच्या नवीन तलाठी सजात समाविष्ट गावे व सजा मुख्यालयांचा तपशील गोळा करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला. या अहवालाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. सध्या जिल्ह्यात २८३ तलाठी सजा असून, नवीन १०३ सजांमुळे आता ही संख्या ४९७ इतकी होणार आहे.

नवीन महसूल मंडलांच्या निर्मितीसाठी नवीन निर्माण झालेल्या तलाठी सजाच्या अनुषंगाने सहा तलाठी सजांसाठी एक याप्रमाणे नवीन १८ महसुली मंडले स्थापन करण्यात येणार असून, १५ फेब्रुवारी २०१८ रोजी नवीन महसुली मंडल निर्माण करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


दोन टप्प्यात होणार भरती

नव्या तलाठी सजांसाठी पदभरती करताना दोन टप्प्यात केली जाणार आहे. त्यानुसार नागरिक क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रात पहिल्या टप्प्यात पदभरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण क्षेत्रात तीन वर्षासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. २०१८ - १९ मध्ये अ व ब वर्गातील गावांसाठी, २०१९-२०२० मध्ये ग्रामीण भागातील तर २०२० - २०२१ मध्ये तटीय क्षेत्रात भरती होणार आहे. या भरतीमुळे महसूल खात्यातील कर्मचाºयांवर असलेला सध्याच्या कामाचा ताण काहीअंशी कमी होणार आहे.

तलाठी पदे मुळातच कमी

ग्रामस्तरावर तलाठी हा महत्त्वाचा घटक असूनही तलाठ्यांची पदे मुळातच कमी आहेत. सध्या तलाठ्यांची ३९९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३३५ पदे भरलेली आहेत, तर ६४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या एकाच तलाठ्याकडे दोन - तीन गावांचा कारभार सोपवला जात आहे.

ही पदे भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. आता या पाठपुराव्याला यश आल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. यापूर्वी तलाठ्यांशी संबंधित असलेले अनेक व्यवहार रखडत होते, ते आता तत्काळ मार्गी लागणार आहेत.

Web Title: Ratnagiri: Open the path for the recruitment of new talathi earrings, complete the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.