रत्नागिरी : गुहागर राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर, ४१७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:05 PM2018-03-12T13:05:56+5:302018-03-12T13:05:56+5:30

गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर, तर नगरसेवकाच्या १७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले.

Ratnagiri: NCP's candidate list for Guhagar, declared 13 candidates for 13 seats | रत्नागिरी : गुहागर राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर, ४१७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार जाहीर

रत्नागिरी : गुहागर राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर, ४१७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देचार प्रभागातील उमेदवारांची घोषणा बाकीगुहागर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकरआमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केली यादी.

गुहागर : गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर, तर नगरसेवकाच्या १७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले.

यामध्ये वॉर्ड क्र. १ मधून सुजाता बागकर यांना पुन्हा संधी मिळाली. प्रभाग २ मधून स्वाती कचरेकर, प्रभाग ३ मधून वर्षा दत्ताराम गिजे, प्रभाग ५ मधून उदय मनीषा कदम, प्रभाग ८ मधून संजय पवार, प्रभाग १० मधून दिगंबर चव्हाण, प्रभाग १२ मधून रुपाली खातू, प्रभाग १५ मधून सेज गोयथळे, प्रभाग १६ मधून संतोष गोयथळे, प्रभाग १७ मधून श्रीया मोरे आदी १३ उमेदवार जाहीर करण्यात आले. यावेळच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी जयदेव मोरे व माजी नगरसेवकांवर असल्याचे सांगितले.

यातील ४, ९, १३, १४ या प्रभागांमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. याबाबत आमदार भास्कर जाधव म्हणाले, तीन ठिकाणी आम्ही गुप्तरित्या अन्य उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो, तशी बोलणी होऊन रणनिती ठरली आहे, असे जाहीरपणे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष विनायक मुळे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, सभापती विभावरी मुळे, उपसभापती पांडुरंग कापले, जयदेव मोरे, शहराध्यक्ष विनायक जाधव, उपनगराध्यक्ष नरेश पवार उपस्थित होते.

अनेकजण इच्छुक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली. उर्वरित पाच प्रभागातील उमेदवारांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. ज्याठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक होते, त्याठिकाणची घोषणा करण्यात आली नसल्याचे समजते.
 

Web Title: Ratnagiri: NCP's candidate list for Guhagar, declared 13 candidates for 13 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.