Ratnagiri: The license of the revolver is named after Ananda area | रत्नागिरी : त्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्रीच्याच नावे
रत्नागिरी : त्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्रीच्याच नावे

ठळक मुद्देत्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्रीच्याच नावेआर्थिक वादातून आनंदचा बळी

रत्नागिरी : झाडगाव एमआयडिसीतील शेट्येनगरमध्ये राहणाऱ्या आनंद क्षेत्रीचा खून करण्यासाठी आरोपी किरण पंचकट्टी याने वापरलेले रिव्हॉल्वर आरोपीने गयाळवाडीजवळील शेट्ये-मलुष्टे नगरात पुरून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हे रिव्हॉल्वर पोलिसांनी हस्तगत केले आहे. मृत आनंद क्षेत्री याच्याच नावाने परवाना असलेले हे रिव्हॉल्वर आनंदचा खून करण्याच्या आदल्या दिवशीच त्याच्या घरी राहणाऱ्या किरण पंचकट्टी याने चोरून नेले होेते.

आनंद याचा खून करणाऱ्या पंचकट्टी याचा साथीदार लक्ष्मण शिंदे याला बोलते करून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी रिव्हॉल्वर शोधून काढले. किरण पंचकट्टी याने गेल्या रविवारी आनंद क्षेत्री याचा डोक्यात गोळी झाडून खून केला होता.

खूनासाठी वापरलेल्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्री याला वर्षभरापूर्वीच मिळाला होता. परवाना मिळाल्यानंतर आनंदने रिव्हॉल्वर खरेदी केले होते. मात्र आर्थिक वादातून त्याच रिव्हॉल्वरने किरण याने आनंदचा बळी घेतला.


Web Title: Ratnagiri: The license of the revolver is named after Ananda area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.