रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जवानांना आदरांजली, कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 02:10 PM2018-10-22T14:10:22+5:302018-10-22T14:12:05+5:30

लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.

Ratnagiri District Police Force honored the jawans, while martyrdom while performing duty | रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जवानांना आदरांजली, कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जवानांना आदरांजली, कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जवानांना आदरांजलीकर्तव्य बजावत असताना हौतात्म्य

रत्नागिरी : लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.

लडाखमधील ह्यहॉट स्प्रिगह्ण या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांवर दिनांक २१ आॅक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राण गमावले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ आॅक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभर ह्यपोलीस स्मृतीदिनह्ण म्हणून पाळण्यात येतो.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचेवतीने पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथील कवायत मैदानावर गेल्या वर्षभरामध्ये पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

हा कार्यक्रम अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. दिनांक १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत भारतामध्ये एकूण ४१९ पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले व शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ०३ पोलीस जवानांनी कर्तव्य बजावीत असताना प्राणार्पण केलेले आहे.

या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (गृह) महादेव वावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढाकणे यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरिक, वकील, सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कुलचे एन.एन.सी.चे विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri District Police Force honored the jawans, while martyrdom while performing duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.