रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:24 PM2018-02-09T18:24:42+5:302018-02-09T18:34:10+5:30

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत अजूनही उदासीनता दिसून येत आहे.

Ratnagiri: Bye-elections in 262 Gram Panchayats in the district, polling on 25th February | रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक२५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत अजूनही उदासीनता दिसून येत आहे.

मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. सरपंच व सर्व सदस्यपदांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर, गुहागर तालुक्यातील असगोली, चिपळूण तालुक्यातील टेरव आणि संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या एकूण ४४४ जागांसाठीही २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यात सर्वात जास्त ग्रामपंचायती संगमेश्वर तालुक्यात (५४) असून, सर्वात कमी ग्रामपंचायती रत्नागिरी तालुक्यात (१२) आहेत.

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी ५ ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, अर्ज भरण्याबाबत अजूनही उमेदवारांमध्ये म्हणावा तितका उत्साह दिसून येत नाही.

चार ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक

मंडणगड : वाल्मिकीनगर
गुहागर : असगोली
चिपळूण : टेरव
संगमेश्वर : तळेकांटे

Web Title: Ratnagiri: Bye-elections in 262 Gram Panchayats in the district, polling on 25th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.