रत्नागिरी : भाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:46 PM2018-12-18T16:46:33+5:302018-12-18T16:47:36+5:30

संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.

Ratnagiri: Alliance with BJP is transient: Jagdish Gaikwad | रत्नागिरी : भाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड

रत्नागिरी : भाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड

Next
ठळक मुद्देभाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड मंडणगडमध्ये रिपाइंतर्फे कार्यकर्ता मेळावा

मंडणगड : भारतीय जनता पार्टीशी असलेली युती राजकीय अजेंड्यानुसार व क्षणिक आहे, हे खुलेपणाने मान्य करून रिपब्लिकन पक्ष दलित समाजाच्या विकासाचे काम करत आहे. फोडाफोडीचे राजकारण कोण करतो, हे जगजाहीर आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही देखरेख असल्याने संविधान सुरक्षित आहे.

संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, तालुका शाखा, मंडणगडच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले बाबासाहेबांचा पक्ष त्यांच्या विचाराने पुढे नेत आहेत. याउलट त्यांचे वारस त्यांच्या विचारांचे विपरीत वर्तन करीत आहेत. त्यांनी नको ते राजकारण करण्यापेक्षा समाजाचे नेतृत्व मान्य करुन रिपब्लिकन एकतेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.

निवडणुकांवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, आगामी काळात आमदार होऊ इच्छिणाऱ्यांना रिपाइंच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावाच लागेल. हेच कार्यकर्ते आपल्या ताकदीच्या आधारे आमदार कोण होणार, हे ठरवणार असल्याने मते विकण्यापेक्षा आधी आपल्या समस्या सोडवा व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष राजेश गमरे यांनी भूषविले.

Web Title: Ratnagiri: Alliance with BJP is transient: Jagdish Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.