रत्नागिरीतील एकांकिका स्पर्धेत सांगलीच्या तेरे मेरे सपने एकांकिकेने पटकावला चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 06:09 PM2018-01-20T18:09:44+5:302018-01-20T18:17:43+5:30

रत्नागिरी भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित व रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या तेरे मेरे सपने या एकांकिकेने पटकावला. मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्कने द्वितीय व इचकरंजीच्या अविरत कलामंचच्या अफूने तिसरा क्रमांक मिळवला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालाच्या म्याडमला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

The Ranji Trophy competition in Ratnagiri was held by Sangli's Tere Mere Sapne Ekankeike | रत्नागिरीतील एकांकिका स्पर्धेत सांगलीच्या तेरे मेरे सपने एकांकिकेने पटकावला चषक

रत्नागिरीतील एकांकिका स्पर्धेत सांगलीच्या तेरे मेरे सपने एकांकिकेने पटकावला चषक

Next
ठळक मुद्देशंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक स्पर्धासावरकर नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरणमुंबईत मानाचि संस्थेमार्फत रत्नागिरीत लेखनाची कार्यशाळा

रत्नागिरी भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित व रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या तेरे मेरे सपने या एकांकिकेने पटकावला. मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्कने द्वितीय व इचकरंजीच्या अविरत कलामंचच्या अफूने तिसरा क्रमांक मिळवला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालाच्या म्याडमला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्वा. सावरकर नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी रात्री झाले. यावेळी प्रमुख पाहुणे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजेश देशपांडे यांनी सांगितले की, नाटक जगले तरच मालिका जगणार आहे. नट कितीही मोठा झाला तरी नाटक, एकांकिकेतून स्वत:ची परीक्षा घेण्याची गरज असते. आम्हीसुद्धा हे करतो.

मुंबईत मानाचि संस्थेमार्फत आम्ही ४०० लेखकांना एकत्र केले आहे. रत्नागिरीतही लेखनाची कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले. सध्या टी. व्ही. मालिकांमुळे सुपारीस्टार वाढत आहेत. मालिका जगण्यासाठी हे नक्कीच उपयोगी आहे, मात्र नाटक, एकांकिकांमधून वषार्नुवर्षे टिकणारे कलाकार निर्माण होतात. लेखक हा शेतकरी आहे. मात्र, ज्या देशात लेखक, शेतकऱ्यांवर अन्याय होतो, त्या देशाचे भवितव्य उज्ज्वल नसतं, अशी टीकाही त्यांनी केली.

एकांकिका स्पर्धेतील बक्षीस

पुरुष अभिनय- यशोधन गडकरी (तो, तेरे मेरे सपने), पराग फडके (घिस्सू, अफू), स्वप्नील धनावडे (नंदू, अर्थवार्म, रसिक रंगभूमी, रत्नागिरी), स्त्री अभिनय- कविता गडकरी (ती, तेरे मेरे सपने), स्नेहल महाडिक (सारा, सॉल्व्हड वन डिव्हायडेड बाय टू इज इक्वल, क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई), सायली जोशी (कोराओ, इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्क), लक्ष्यवेधी भूमिका- आर्यन कासारे (बनी तो बनी, संस्कृती फाऊंडेशन, लांजा). दिग्दर्शन - साबा राऊळ (इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्क), यशोधन गडकरी (तेरे मेरे), अनिरुद्ध दांडेकर (अफू), नेपथ्य - केतकी, अभिषेक (तेरे मेरे), अनिकेत विचारे (इव्होल्युशन), राजेश, चेतन व विशाल (म्याडम), पार्श्वसंगीत - नादश्री व अभिमन्यू (तेरे मेरे सपने), अक्षय व गौरव (म्याडम), कश्मिरा सावंत (अल्पविराम, कलारंग रत्नागिरी), प्रकाशयोजना - सुप्रभात व निर्मला (तेरे मेरे सपने), अनिरुद्ध दांडेकर (अफू), शुभम व अक्षय (म्याडम). लेखन - इरफान मुजावर (तेरे मेरे सपने), प्राजक्ता देशमुख (अफू). स्टार थिएटर्सतर्फे स्व. आनंद प्रभुदेसाई स्मृती विनोदी अभिनय - विशाल जाधव (मल्टीप्लस आम्ही कलाकार, भार्इंदर). विजयकुमार नाईक, संजय बोरकर व आनंद म्हसवेकर यांनी परीक्षण केले.
 

Web Title: The Ranji Trophy competition in Ratnagiri was held by Sangli's Tere Mere Sapne Ekankeike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.