वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:23 PM2017-12-07T17:23:13+5:302017-12-07T17:26:46+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजारपेठांमध्ये शितगृहातील मासे विक्रीला येत आहेत. परंतु बाजारपेठेतील मच्छीची आवक खुपच कमी आहे. ​​​​​​​

Now the stormy atmosphere will go away, now the fishermen in Ratnagiri district look | वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर

वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर

Next
ठळक मुद्देमिरकरवाडासह अन्य बंदरांमध्येही मच्छीमार खलाशांची उडाली धावपळबाजारपेठेतील मच्छीची आवक खुपच कमी

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजारपेठांमध्ये शितगृहातील मासे विक्रीला येत आहेत. परंतु बाजारपेठेतील मच्छीची आवक खुपच कमी आहे.

ओखी वादळ केरळच्या सागरी किनाऱ्यावरून प्रथम इशान्य दिशेकडे वळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरीच्या किनारपट्टी भागाला बसला आहे. मात्र हे ओखी वादळ इशान्येकडे वळण्याऐेवजी वायव्येकडे वळल्याने गुजरातच्या दिशेने पुढे गेले आहे.

परंतु रत्नागिरीत या वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मंगळवारी दिवसभर रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरींचा पाऊस झाला. त्यामुळे रत्नागिरीच्या मिरकरवाडासह अन्य बंदरांमध्येही मच्छीमार खलाशांची धावपळ उडाली.

Web Title: Now the stormy atmosphere will go away, now the fishermen in Ratnagiri district look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.