...आता दंडाची पावती जागेवरच !

By admin | Published: August 17, 2016 09:21 PM2016-08-17T21:21:32+5:302016-08-17T23:10:19+5:30

पोलिसांना आदेश : वाहनचालकाला न्यायालयात हजर करण्याची आवश्यकता नाही

Now the receipt of the penalty is on the spot! | ...आता दंडाची पावती जागेवरच !

...आता दंडाची पावती जागेवरच !

Next

दापोली : वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनाची कागदपत्र सोबत नसणे आणि वाहन सुस्थितीत नसताना रस्त्यावर आणणाऱ्या वाहनचालकांना राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून पूर्वी न्यायालयात हजर केले जात होते. मात्र, राज्यभरातील वाहतूक शाखेच्या पोलिसांना आता जाग्यावरच दंड आणि त्या दंडाची पावती फाडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाभरात या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याने बेशिस्त वाहनचालक धास्तावले आहेत. नवीन आदेशानुसार वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास ३०० रुपये, गाडी चालवताना भ्रमणध्वनी कानाला लावलेला असल्यास १०० रुपये, धूमस्टाईल गाडी चालवताना आढळल्यास ५०० रुपये, त्याचप्रमाणे नवीन गाडी घेतल्यानंतर तिचे रजिस्ट्रेशन होण्यापूर्वीच नंबरविना चालवणे, यासाठी १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडीचा इंडिकेटर तुटलेला असणे आदींसाठी दंडाची आकारणी होणार आहे. दरम्यान, दापोली पोलीस स्थानकाच्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक शिंंदे यांनी १२ दिवसांत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गृह विभागाच्या नव्या आदेशामुळे आता वाहतूक पोलिसांना जाग्यावरच दंडाची वसुली करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यापूर्वी अशा वाहनचालकांना न्यायालयात हजर केले जात असे. त्यानंतर न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात येत असे. मात्र, या नव्या आदेशामुळे आता अशा बाबींसाठी न्यायालयात जाण्याची गरज संपुष्टात आली आहे.
दरम्यान, एखाद्या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे आणि त्याने आपली गाडी दुसऱ्या व्यक्तीला मात्र जिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, अशा व्यक्तीला चालवण्यास दिल्यास आणि पोलिसांच्या तपासणीत ही बाब पुढे आल्यास गाडीच्या मालकाला ३०० रुपये आणि परवाना नसताना गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ३०० असा एकूण ६०० रुपयांचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे यापुढे आपल्या मालकीची गाडी परवाना नसलेल्या व्यक्तीला देताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the receipt of the penalty is on the spot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.