Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:53 AM2019-04-16T11:53:24+5:302019-04-16T11:55:05+5:30

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य

Lok Sabha Election 2019 Ratnagiri, Kankavli Vidhan Sabha constituencies are important? | Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : दोन विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा

प्रकाश वराडकर । 

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांसाठी निसटते मताधिक्य देणारे ठरू शकते, असा राजकीय अंदाज आहे. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे सेनेचे विनायक राऊत व तत्कालिन कॉँग्रेस उमेदवार आणि  या निवडणुकीतील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आमने -सामने उभे ठाकले आहेत. तसेच कॉँगे्रस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित आघाडीचे मारूती काका जोशी व बहुजन समाज पार्टीचे सुरेश वरक हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, यावेळी खरी लढत ही शिवसेनेचे विनायक राऊत व स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच आहे. सध्यस्थितीत तरी कॉँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर हे तिसºया क्रमांकावर आहेत.

या निवडणुकीत विनायक राऊत व नीलेश राणे अर्थात शिवसेना व नारायण राणे यांच्यात प्रतिष्ठेचा सामना होत आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र, गेल्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत यांनी विक्रमी ३९ हजार ३२७ एवढे मताधिक्य मिळवले होते. उदय सामंत यांना ९३,४३६ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बाळ माने यांना ५४,१४८ मते मिळाली होती. 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून ७० ते ८० टक्के कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश केला. आधीच रत्नागिरीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली सेना बळकट होतीच. त्यात राष्टÑवादीतील कार्यकर्त्यांमुळे या मतदारसंघात सेनेला दुप्पट बळ मिळाले. या लोकसभा निवडणुकीत  सेना-भाजप युतीमुळे राऊत यांना भाजपचेही बळ मिळणार आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्य हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मिळेल, अशी अटकळ आहे.

त्याचवेळी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे (सध्या स्वाभिमान पक्ष) यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात २५,९७९ एवढे मताधिक्य मिळाले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल राजकीय स्थिती असतानाही नितेश राणे यांनी मिळविलेले २५ हजारचे मताधिक्य हे विरोधकांसाठी त्यावेळी विक्रमीच होते. जसा रत्नागिरी मतदारसंघ सेनेचे आमदार उदय सामंत यांनी पिंजून काढला आहे, आपले राजकीय वर्चस्व स्थापित केले आहे तसेच कणकवली मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांच्या काळात आमदार नितेश राणे यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली मतदारसंघात त्यांचा संपर्क व काम करण्याची पध्दत पाहता गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2019 Ratnagiri, Kankavli Vidhan Sabha constituencies are important?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.