जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:38 PM2019-07-08T16:38:53+5:302019-07-08T16:41:40+5:30

गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

Life-seeking for them while deciding the ambulance! | जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

googlenewsNext
ठळक मुद्देजगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांना वरदान, १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यात यश

अरूण आडिवरेकर 

रत्नागिरी : गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

अपघातानंतर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आजवर या रूग्णवाहिका ५ हजार ८११ अपघातस्थळी धावल्या असून, १२ हजार ४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत.

नरेंद्रचार्य महाराजांनी भाविकांना व देणगीदारांना आवाहन केले. त्यातून २७ रुग्णवाहिका संस्थानला दान मिळाल्या. त्या आधारावर २०११पासून ही सेवा सत्यात आली. तेव्हापासून ती रात्रंदिवस, अखंड २४ तास सुरू आहे. सेवा पूर्णपणे मोफत सुरू ठेवली असून, जखमींकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात नाहीत. गाड्याचे इंधन, त्यांची देखभाल व चालकांचा पगार सारे संस्थान करते. वर्षाला साधारण ६० ते ७० लाख रुपये या सेवेवर खर्च होत असतात. हे कार्यदेखील भाविकांनी दिलेल्या देणग्यातून सुरू आहे.

सुरूवातीला मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेली ही सेवा टप्प्याटप्प्याने वाढत राज्याच्या हद्दीतील मुंवई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, मुंबई-आग्रा व पुणे-बंगलोर अशा पाच महामार्गांवर सुरू आहे. अपघातातील जखमींसाठी या रुग्णवाहिका जणू देवदूतच बनल्या आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे ३१ मार्च २०१९पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५,८११ अपघातस्थळी धावल्या आहेत. तसेच तेथील १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एकतर अरुंद रस्ता, वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार वा तीव्र चढ असलेला हा मार्ग आहे. वाहनांचा वेगही अपघाताचे मोठे कारण ठरत आहे. या महामार्गावर महाराष्ट्रच्या हद्दीत आजपर्यंत १,५२९ अपघात झाले, त्यात ३,७१५ जण जखमी झाले आहेत.
 

समाधान मिळते
२००९पासून चालक म्हणून काम करत आहे. माझ्या कामाला वेळ नाही, रात्री-अपरात्री केव्हाही निघावे लागते. जखमींना पाहून मनाला खूप वेदना होतात. तरीही मन घट्ट करून त्यांना धीर देतो. आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचल्याचे समाधान मिळते, मन:शांती मिळते.
-धनेश शिवाजी केतकर, चालक
 

दहा मिनिटात मदत
खड्ड्याचा अंदाज न आल्याने वांद्री येथे मी व माझी पत्नी स्नेहा दुचाकीवरून पडून जखमी झालो. पत्नी बेशुद्ध पडली. कोणीतरी सांगितले, थांबा संस्थानची रूग्णवाहिका येईल आणि केवळ दहा मिनिटातच गाडी आली. त्यामुळे माझ्या पत्नीवर उपचार होऊन तिचे प्राण वाचले.
- संदीप बोरसुतकर, अपघातग्रस्त

 



पाचही मार्गावर मदतकार्य

पाचही महामार्गावरील रुग्णालयात पोहोचवलेल्या जखमींची संख्या अशी आहे. मुंबई-गोवा महामार्ग- ३,७१५. मुंबई - आग्रा महामार्ग- ३,७४४. मुंबई-हैदराबाद महामार्ग -१,८७५, मुंबई- अहमदाबाद महामार्ग- २,१२३, पुणे-बंगलोर महामार्ग-९९३. अशातऱ्हेने एकूण ५,८११ अपघातात १२,४५० जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

Web Title: Life-seeking for them while deciding the ambulance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.