लांजात दारुभट्टीवर छापा, दोघेजण अटकेत : पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 10:27am

लांजा तालुक्यातील झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बाळकृष्ण वामन वामनसे (४९) व तुकाराम गणू कुंभार (४८) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लांजा/रत्नागिरी ,दि. ११ : लांजा तालुक्यातील झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बाळकृष्ण वामन वामनसे (४९) व तुकाराम गणू कुंभार (४८) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारूची भट्टी लावली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी पथक लांजा येथे रवाना केले होते़

उंबऱ्याचा पऱ्या या ठिकाणी बाळकृष्ण वामनसे व तुकाराम कुंभार हे दारू निर्मिती करताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी ही भट्टी बाळकृष्ण वामनसे यांची असल्याचे समोर आले.

त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे २०० लीटर इतके ३० बॅरलमध्ये साठवलेले गूळ व नवसागर मिश्रीत रसायन, १३५ लीटर गावठी दारू, पाण्याचा पंप व भट्टीचे साहित्य असे मिळून १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांच्या विरोधात लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक पोलीस फौजदार विष्णू नागले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील पंडित, राकेश बागुल, दत्ता कांबळे यांनी केली.

संबंधित

बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश
भीमा हाटे मृत्युप्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे द्या
मोबाईल चोरणारी लेडीज गॅंग जेरबंद 
अमानुषपणाचा कळस...नोकरीचे आमिष दाखवून ४० पुरुषांनी केला तरुणीवर बलात्कार 
भद्रकालीतील लॉजवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी कडून आणखी

रत्नागिरी : लांजा शहरात चार फ्लॅट फोडले, पोलिसांसमोर आव्हान, दोन ठिकाणीच चोरटे यशस्वी
रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा
मत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेच, विद्यार्थ्यांचे नुकसान
रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय
सार्वत्रिक निवडणुकांवर नजर, रत्नागिरीत बदलांमागे राजकीय सोय

आणखी वाचा