अखेर रमेश कदम काँग्रेसमध्ये-प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:14 PM2017-11-22T22:14:43+5:302017-11-22T22:14:59+5:30

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Finally Ramesh Kadam in the presence of Congress-State President in Mumbai | अखेर रमेश कदम काँग्रेसमध्ये-प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम

अखेर रमेश कदम काँग्रेसमध्ये-प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम

Next

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने कोणतीही जबाबदारी न दिल्याने कदम यांनी पक्षास सोडचिठ्ठी देणार असल्याची नाराजी महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.
मुंबई येथील टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमेश कदम यांनी आपण वयाच्या १८ व्या वर्षांपासून काँग्रेसमध्ये तळागाळात काम केले आहे. पुन्हा एकदा आपण काँग्रेसमध्ये काम करीत असताना कोकणात काँग्रेसला चांगले दिवस आणू. आपल्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी रमेश कदम यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते.

यांनी केला पक्ष प्रवेश
सिंधुदुर्गचे वसंत केसरकर यांनीही काँगे्रसमध्ये प्रवेश केला. रमेश कदम यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, माजी नगरसेवक रमेश खळे, पांडुरंग भैरवकर, हारुणभाई कच्छी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, हिंदुराव पवार, दीपक कदम, आदी निवडक सहकाºयांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


आता स्वबळावर जिंकू : दलवाई
रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होईल. वसंत केसरकर, पुष्पसेन सावंत यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काँग्रेस मजबूत होईल व पुढच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर जिंकू शकेल, असा विश्वास खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.

जातीवादी संघटनांना आळा बसेल
कोकणात जातीयवादी संघटनांना माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे आळा बसेल. आता सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हनिफ कुरेशी यांनी सांगितले.

कोकणात काँग्रेस मजबूत होईल
माजी आमदार रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे चांगला निर्णय होतोय. एक लढवय्या, अभ्यासू नेता काँग्रेसमध्ये येत असल्याने कोकणात काँग्रेस अधिक मजबूत होईल. आपण विधिमंडळात त्यांच्याबरोबर काम केले असल्याने त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे, असे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी सांगितले.

कार्यकर्ते, पदाधिकारी समाधानी
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकिशोर थरवळ, काँग्रेसचे प्रवक्ते इब्राहिम दलवाई, माजी सरपंच वासुदेव मेस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक कदम, महिला प्रदेश सदस्या सावंत, राष्ट्रवादीचे माजी खजिनदार रोशन दलवाई यांनीही रमेश कदम यांच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

रमेश कदम यांच्या रूपाने काँग्रेसला चांगले नेतृत्व मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला नेतृत्वाचा अभाव जाणवत होता. ती कसर आता कदम यांच्यामुळे भरून निघाली आहे. कोकणात पूर्वी काँग्रेस प्रबळ होती. कदम यांच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा कोकणात काँग्रेसला वैभवाचे दिवस येतील.
- अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Finally Ramesh Kadam in the presence of Congress-State President in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.