रत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:43 PM2018-06-25T17:43:35+5:302018-06-25T17:45:15+5:30

नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़

Discussion of Ratnagiri prize money, work of wells in Panchayat Samiti | रत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा

रत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समिती सभेत चर्चाग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती

रत्नागिरी : नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़

ही सभा प्रभारी सभापती नावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ ह्यउन्नत शेती, समृध्द शेतकरीह्ण या योजनेंतर्गत ५३९ शेतकऱ्यांचे पॉवर स्प्रे व ग्रासकटर अनुदान जमा करण्यात आले आहे़ तालुक्यातील कासारवेली गावाची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झाल्याचे यावेळी रोजगार हमी योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले़

चालू शैक्षणिक वर्षात रत्नागिरी तालुक्यात २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी पहिली इयत्तेत प्रवेश घेतला आहे़ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असले तरी काही विषयांची पुस्तके नुकतीच उपलब्ध झाली असून, ती पुढील आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहेत़.

तालुक्यातील नाखरे-उंबरवाडी येथील शाळेची पटसंख्या केवळ ३ असल्याने, शासन निर्णयानुसार ही शाळा बंद करावी लागणार आहे़ परंतु, सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने ही पटसंख्या १२ एवढी झाली असली तरी किमान २० पटसंख्या असेल तर ही शाळा सुरू ठेवता येणार आहे़ त्यामुळे यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी सभागृहात स्पष्ट केले़

नाविन्यपूर्ण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत तालुक्याला विहिरींची कामे मंजूर झाली आहेत़ त्यासाठी १० लाखांचा निधीही उपलब्ध झाला आहे़ परंतु, विहिरींसाठी लागणारी जागा बक्षीसपत्र नसल्यामुळे या योजनेतील २१ विहिरींची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामध्ये सभागृहाने लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी केली़

Web Title: Discussion of Ratnagiri prize money, work of wells in Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.