रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 03:48 PM2018-12-24T15:48:25+5:302018-12-24T15:51:08+5:30

रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डिजिटल युगाची नवी लायब्ररी या संदर्भाने अधिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

Digital Library to be set up in Ratnagiri District Nagar | रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी

googlenewsNext
ठळक मुद्देशतकोत्तर शतक महोत्सव - दीपक पटवर्धन यांचा संकल्पवाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ एकत्रित करण्याचा प्रयत्न

अरूण आडिवरेकर

रत्नागिरी : रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डिजिटल युगाची नवी लायब्ररी या संदर्भाने अधिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

याबाबत माहिती देताना दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, सलग प्रदीर्घ काळ हे वाचनालय सुरू असून, ग्रंथ वाचकांची वाचनतृष्णा अखंड भागवत आहे. आज वाचनसंस्कृती लोप पावते की काय, अशी चिंता अनेकजण व्यक्त करतात. परंतु, वाचन अखंड सुरू राहणार आहे.

कदाचित पृष्ठांकित ग्रंथांची जागा इलेक्ट्रॉनिक साधनांनी पूर्णांशाने घेतलेली असेल, पण साहित्य निर्मिती ही होतच राहील. कारण तहान पाण्याची असो की वाचनाची ती अव्याहत राहते. हेच या ग्रंथालयाच्या २०० वर्षांच्या वाटचालीकडे पाहिल्यावर अधिक तीव्रतेने पटते.

महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या वाचनालयांपैकी हे वाचनालय असून, ते आपल्या कोकणात, आपल्या रत्नागिरीत आहे, याचा अभिमान आपल्याला नक्की आहे. समृद्ध वाचनालय हे त्या शहराची सुसंस्कृतता अधोरेखित करते. ग्रंथालयासारख्या सरस्वतीची आराधना करणाऱ्या संस्था, ज्या शहराने १९१ वर्ष जोपासल्या.

केवळ राजाश्रय मिळून संस्था विकसित होत नाहीत तर जागृत, उच्च अभिरुची जोपासणाऱ्या समाजाच्या सहभागानेच वाचनालये टिकून राहतात आणि असं वाचनालय १९१ वर्षे आपली साथ करतंय. त्यामुळे समस्त रत्नागिरीकरांसाठी हे वाचनालय अभिमानास्पद आहे.

१९० वर्ष पूर्ण होत असताना, २०० वर्षांचा सुवर्णक्षण साजरा करण्याची आतुरता लपवता येत नाही. २९९ वर्ष पूर्ण करताना हे वाचनालय कशा स्वरूपात असावे, भौतिक स्वरूप, उत्तम वास्तू अद्ययावत असावी, नवीन तंत्रज्ञान साधने असावीत, अभ्यासिका अद्ययावत असावी, ग्रंथसंपदा वृद्धिंगत होत राहावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

या वाचनालयाची वाचक संख्या १० वर्षात किमान २५ हजार होईल, युवक वाचक, विद्यार्थी वाचक यांना या वाचनालयाचे कसे आकर्षण वाटेल, असे वाचनालयाचे स्वरूप उभे करणे, या जुन्या ग्रंथसंपदेला संरक्षित करत ही जुनी ग्रंथसंपदा जगभरातील वाचकांना उपलब्ध होईल यासाठी तंत्रज्ञानाचा प्रबंध करणे, असे अनेक उपक्रम मनात असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध समित्या स्थापणार

२०० वर्ष साजरी करताना संस्मरणीय गोष्टींनी हे वाचनालय कसे समृद्ध करावे, याची योजना आखण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीकरांबरोबरच महाराष्ट्रातले साहित्यिक, प्रकाशक, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, प्रामुख्याने युवक, पत्रकार आणि सर्व ग्रंथप्रेमी नागरिक या सर्वांनी वैचारिक योगदान करावे. युवकांच्या पुढाकाराने विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
 

Web Title: Digital Library to be set up in Ratnagiri District Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.