देवाचा डोंगर धनगरवाडी पाणीटंचाई मुक्त

By Admin | Published: March 30, 2017 04:24 PM2017-03-30T16:24:14+5:302017-03-30T16:24:14+5:30

राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे वाडीत मुबलक पाणी

Dhankarwadi water from God's mountain, water shortage-free | देवाचा डोंगर धनगरवाडी पाणीटंचाई मुक्त

देवाचा डोंगर धनगरवाडी पाणीटंचाई मुक्त

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
खेड, दि. ३0 : तालुक्यातील ४० धनगरवाड्यांचा पाणीप्रश्न पेटू लागला आहे. मात्र, वर्षानुवर्षे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या देवाचाडोंगर धनगरवाडीतील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न यावर्षी निकाली निघाला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे या वाडीत मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, ग्रामस्थांची पाण्याची तहान भागण्यास मदत झाली आहे.


दोन महिन्यांपूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली असतानाही प्रशासनाने प्रलंबित ठेवलेल्या सहा धनगरवाड्यांना आता खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, वषानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या देवाचा डोंगर धनगरवाडीतील ग्रामस्थांना आता मुबलक पाणी मिळत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत या वाडीला तब्बल दोन विहिरी बांधून मिळाल्या असून, या दोन्ही विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४०पैकी एक धनगरवाडी पाणीटंचाईपासून कायमची मुक्त झाली आहे. येथील शेतकरी बाबू बावधाने यांनी याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.


देवाचा डोंगर धनगरवाडीतील सर्वच ग्रामस्थांना सुमारे पच किलोमीटर अंतरावरून सातारा जामगे येथून पाणी आणावे लागते. ज्यांची दुचाकी किंवा तीनचाकी गाडी असेल त्यांनाच हे शक्य होते. सर्वांचाच भातशेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. जोडीला हे लोक शेळी पालनाचा व्यवसायही करतात. मात्र, पाण्याची समस्या असल्याने त्यांच्या या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपावेतो हा समाज आपल्या व्यवसायाला आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिला होता. मात्र, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेने देवाचा डोंगर येथील धनगरवाडीला आशेचा किरण दाखवला आहे.

या वाडीला दोन विहिरी मंजूर झाल्या आणि ग्रामस्थांनीच पाण्याची जागा शोधली. यानंतर प्रशासनाने तसा अहवाल तयार केल्यानंतर वाडीला या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित करण्यात आले. डिसेंबर २०१६मध्येच दोन्ही विहिरी पाण्याने भरल्या. आता मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा या विहिरींमध्ये असल्याचे बावधाने यांनी सांगितले. यामुळे या पाण्याच्या आधारे आता शेळी पालन व दुधाचा व्यवसाय करणे सहज व सोपे होईल, असेही ते म्हणाले. या वाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. (प्रतिनिधी)

Web Title: Dhankarwadi water from God's mountain, water shortage-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.