भिरकोंड येथे बिबट्याचा भुकेने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 07:34 PM2019-05-18T19:34:16+5:302019-05-18T19:35:16+5:30

भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना डिंगणी रोडवरील भिरकोंड - गुरववाडी येथे घडली.

Death of lethargy death at Bhirkond | भिरकोंड येथे बिबट्याचा भुकेने मृत्यू

भिरकोंड येथे बिबट्याचा भुकेने मृत्यू

Next
ठळक मुद्देभिरकोंड येथे बिबट्याचा भुकेने मृत्यूपरिमंडल वन अधिकारी घटनास्थळी

देवरूख : भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना डिंगणी रोडवरील भिरकोंड - गुरववाडी येथे घडली.

भिरकोंड - गुरववाडी येथे मृत अवस्थेत बिबट्याचे पिल्लू दिसले. ते सुमारे वर्षभराचे असल्याचे परिमंडल वन अधिकारी विजयराज सुर्वे यांनी सांगितले. परिमंडल वन अधिकारी सुरेश उपरे, वनरक्षक एन. एस. गावडे, शर्वरी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बिबट्या भिरकोंड गुरववाडी येथील गणपत गुरव यांच्या घराशेजारी आढळला. हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर त्यांनी ही खबर पोलीसपाटील सुभाष गुरव यांना दिली. गुरव यांनी देवरूख वन विभागाला माहिती दिली.

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शवविच्छेदन केले. या दरम्यान बिबट्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे आढळून आले. अनेक दिवस भुकेने व्याकूळ असल्यानेच त्याने प्राण सोडल्याचे स्पष्ट झाले. या मृत बिबट्यावर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वाहनांच्या धडकेत आणि भुकेमुळे बिबटे मरण्याच्या प्रमाणात अलिकडे वाढ होत आहे.

महिन्यातील तिसरी घटना

संगमेश्वर तालुक्यात बिबट्या मृत होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात सावजाच्या पाठीमागे पोलवर चढलेला बिबट्या विजेचा धक्का लागून मृत झाला होता, तर तुरळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गतप्राण झाला होता. भिरकोेंडमधील ही तिसरी घटना आहे.

Web Title: Death of lethargy death at Bhirkond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.