कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला नगर राजभाषा शील्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:21 PM2017-12-11T12:21:33+5:302017-12-11T12:25:06+5:30

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला २०१६-१७ या वर्षासाठीचा ह्यनगर राजभाषा शील्डह्ण प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सलग चौथ्यांदा मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच स्वीकारला. कोकण रेल्वेच्या कामामध्ये हिंदी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राजभाषा कार्यान्वय समितीतर्फे कोकण रेल्वेच्या ३३ सदस्य कार्यालयासाठी ही बहुविध स्पर्धा आयोजित केली होती.

City Official Language Shield to Ratnagiri Divisional Office of Konkan Railway | कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला नगर राजभाषा शील्ड

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक उपेंद्र शेंड्ये व येथील उपमुख्य राजभाषा अधिकारी कृष्णा लंबाणी यांनी हा पुरस्कार संयुक्तरित्या स्वीकारला.

Next
ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या कामामध्ये हिंदी भाषेच्या वापरास प्रोत्साहनराजभाषा कार्यान्वय समितीतर्फे कोकण रेल्वेच्या ३३ सदस्य कार्यालयासाठी बहुविध स्पर्धा

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला २०१६-१७ या वर्षासाठीचा नगर राजभाषा शील्ड प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सलग चौथ्यांदा मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच स्वीकारला.

कोकण रेल्वेच्या कामामध्ये हिंदी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राजभाषा कार्यान्वय समितीतर्फे कोकण रेल्वेच्या ३३ सदस्य कार्यालयासाठी ही बहुविध स्पर्धा आयोजित केली होती.


गृह मंत्रालयाच्या उपनिदेशक डॉ. सुनीता यादव यांच्या हस्ते न्युक्लियर पॉवर कार्पोरेशनच्या कुवारबाव, रत्नागिरी येथील सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक उपेंद्र शेंड्ये व येथील उपमुख्य राजभाषा अधिकारी कृष्णा लंबाणी यांनी हा पुरस्कार संयुक्तरित्या स्वीकारला. यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत यश संपादन केल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सुत्रांनी दिली.

Web Title: City Official Language Shield to Ratnagiri Divisional Office of Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.