उत्सव लोकशाहीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:45 AM2019-05-08T00:45:50+5:302019-05-08T00:47:02+5:30

निवडणुकीची जबाबदारी डोक्यावर असल्याने खूपच दडपण आले. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याने ती पेलणे हे एक आव्हान होते. आजारी पडलो असतानाही कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रत्येक क्षण कारणी लावण्याचे मनोमन ठरवले.

Celebration of democracy .. | उत्सव लोकशाहीचा

उत्सव लोकशाहीचा

Next

-- मितेश घट्टे

निवडणुकीची जबाबदारी डोक्यावर असल्याने खूपच दडपण आले. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याने ती पेलणे हे एक आव्हान होते. आजारी पडलो असतानाही कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रत्येक क्षण कारणी लावण्याचे मनोमन ठरवले. गुन्हे शाखेचे पोलीस अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी या काळात आधार देऊन खूप मदत केली.

निसर्गसौंदर्याची देणगी लाभलेल्या शांत रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावल्यानंतर पुणे शहरात माझी पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली. मूळच्या शांत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावताना काहीसा निवांतपणा लाभल्याने वाचन... निसर्गाच्या सानिध्यात भटकंती... जनसंपर्क जोडण्याची आवड जोपासता आली होती. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी माझ्याकडे विशेष शाखेची जबाबदारी सोपवली. खरेतर आतापर्यंत या पदाची धुरा ज्येष्ठ आयपीएस अधिकाºयांनी सांभाळली होती. त्यांची पदतालिका पाहून उपायुक्तांच्या कक्षात प्रवेश करताना पोलीस आयुक्तांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे मनावर प्रचंड दडपण आले होते. त्यातच पुण्याला बदली झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीचे संकेत मिळू लागले होते. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन विशेष शाखेकडून मागील ४ - ५ महिन्यांपासून तत्कालीन पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते.
निवडणुकीच्या कामकाजाचे नियंत्रण सुटसुटीत होण्यासाठी विशेष शाखेंतर्गत ‘इलेक्शन सेल'ची स्थापना झाली होती. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी सन २०१४मधील लोकसभा निवडणूक अत्यंत कुशलतेने हाताळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पण निवडणूक नियोजनात पोलीस प्रशासन व्यस्त झाले. पोलीस ठाण्यांकडील मनुष्यबळ, वाहने, वायरलेस सेट तसेच आवश्यक साधनसामुग्रीचा आढावा घेण्यास प्रारंभ केला. काम सुरू असतानाच आचारसंहिता ५ मार्चला जाहीर झाल्यानंतर आमच्या तयारीला वेग आला. मात्र, अचानक माझ्या जुन्या पाठदुखीच्या आजारपणाने डोकं वर काढलं. निवडणुकीची जबाबदारी डोक्यावर असल्याने खूपच दडपण आले.

निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर असल्याने ती पेलणे हे एक आव्हान होते. आजारी पडलो असतानाही कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रत्येक क्षण कारणी लावण्याचे मनोमन ठरवले. गुन्हे शाखेचे पोलीस अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी या काळात आधार देऊन खूप मदत केली. त्यांनी निवडणूक काळातील पोलीस बंदोबस्ताचा आराखडा तयार केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे सखोल नियोजन करून गुन्हेगारांच्या हालचालींना पायबंद घातला. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याचा आटोकाट प्रयत्न सांघिक स्वरुपात झाला.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतानाच प्रचाराच्या निमित्ताने व्हीआयपी दौरे वाढले होते. व्हीआयपी दौºयांचा बंदोबस्त नीटनेटका करण्याचाही प्रयत्न केला. निवडणुकीच्या प्रचारातील अखेरच्या टप्प्यावर नरेंद्र मोदी, पंतप्रधान यांनी माढ्याच्या वाटेवर पुण्यात मुक्काम केला. पंतप्रधानांना असलेले सुरक्षाविषयक धोके लक्षात घेता पुणे पोलिसांच्या क्षमतेचा कस लागला. व्हीआयपी दौरा असताना महत्त्वाचा मुद्दा असतो तो वाहतुकीचा... यावेळी परिमंडळाचे पोलीस उपायुक्त व पंकज देशमुख (पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा) यांनी समन्वय ठेवत चोख कर्तव्य पार पाडत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

अत्यंत नेटका बंदोबस्त झाल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे दिल्लीहून आलेल्या एसपीजी टीमने कौतुक केले. थोडक्या वेळेत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री यांच्या पुणे भेटीदरम्यान पुणे पोलिसांनी अत्यंत कमालीची व्यावसायिक कौशल्ये दाखवत चोख कर्तव्य पार पाडले. रवींद्र सेनगावकर सर व सुनील फुलारी (अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग) यांनी पुण्यात यापूर्वी आलेल्या अनुभवांवर आधारित महत्त्वाच्या सूचना विशेष शाखेला दिल्याने नियोजनात नेटकेपणा आणणे शक्य झाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बदल्यांमुळे विशेष शाखेत अनेक अधिकारी नव्याने रूजू झाले. त्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि नव्याने आलेल्या अधिकाºयांचे पथक तयार करताना एक वेगळाचा अनुभव आला. त्या नवख्या अधिकाºयांचा उत्साह आणि जुन्या जाणत्या अधिकाºयांचा अनुभव याची सांगड घालण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अनेकदा घड्याळाचे काटे भरभर सरणाºयांना वेळेची जाणीव करुन द्यायचे, वेळप्रसंगी रात्रभर कर्तव्य बजावावे लागले.

मात्र, विशेष शाखेतील माझा कोणताही सहकारी मागे हटला नाही. यात विशेषत: सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ व चंद्रकांत सांगळे, पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, डॉ. विकास राऊत यांचे मला विशेष कौतुक वाटते. (साºयांचा नामोल्लेख केला नसला, तरी विशेष शाखेतील प्रत्येकाचे योगदान निश्चितच महत्वपूर्ण आहे.) मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी निवडणूक काळातील आर्थिक तरतुदीची घडी बसवल्याने योग्य नियोजन झाले.
व्यंकटेशम (पोलीस आयुक्त) आणि शिवाजी बोडखे (पोलीस सहआयुक्त) यांनी आम्हाला अनुभवाचे बोल सांगत आवश्यक त्या सर्व बाबींची उपलब्धता करून दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही कोणतेही अवघड आव्हान सहजपणे पार पाडू, असा विश्वास प्रत्येकाच्या ठायी निर्माण झाला. सर्वात मोठे आव्हान होते ते निवडणूक निरीक्षकांचे...! त्यांनी काटेकोरपणे पुण्यातील सर्व निवडणूक यंत्रणेची आणि सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्तता करताना पुरती दमछाक व्हायची. पण जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर जिल्हाधिकारी काळे, सुरेश जाधव तसेच उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, मोनिका सिंह व अमृत नाटेकर यांच्याशी ठेवलेल्या समन्वयामुळे त्यात कोणत्याही त्रुटी राहिल्या नाहीत.

आचारसंहिता लागल्यापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत प्रत्येक दिवस आव्हानात्मक होता. वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्तांचा सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांशी कायम संवाद आणि पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस दलातील नव्या-जुन्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे हे आव्हान शांततेत पेलता आले.


बदल्यांमुळे विशेष शाखेत अनेक अधिकारी नव्याने रूजू झाले. त्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि नव्याने आलेल्या अधिकाºयांचे पथक तयार करताना एक वेगळाचा अनुभव आला. त्या नवख्या अधिकाºयांचा उत्साह आणि जुन्या जाणत्या अधिकाºयांचा अनुभव याची सांगड घालण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

 

 

निवडणुकीसाठीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत सर्वजण एकदिलाने काम करत होते. दि. २३ मे रोजी जाहीर होणाºया निकालाने या पंचवार्षिक सोहळ्याची सांगता होईल. पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्ताचे नियोजन करताना काही गोष्टी नव्याने शिकता आल्या... अनुभवता आल्या. नव्याने शिकलेल्या गोष्टी... नव्याने आलेले अनुभव... नव्याने झालेल्या ओळखी... वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन आणि सहकाºयांचे विश्वासार्ह सहकार्य निश्चितपणे पुढील सेवेसाठी बळ देणारे ठरेल, यात शंका नाही.
मितेश घट्टे   पोलीस उपायुक्त, पुणे

Web Title: Celebration of democracy ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.