एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन : दापोली आगारात परिवहनमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:46 AM2017-10-18T11:46:17+5:302017-10-18T12:51:33+5:30

सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यानी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये एक हजार ७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेऱ्या सकाळी झाल्या. त्यानंतर शंभर टक्के बसेस बंदच होत्या. यामुळे जिल्ह्यातील आगारांचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

The burning of the statue of Ravite in Dapoli Agathe | एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन : दापोली आगारात परिवहनमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन : दापोली आगारात परिवहनमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next
ठळक मुद्देचालक-वाहक संपकरी कर्मचाऱ्यांनी केला निषेधराष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखलएसटी कर्मचा-यांचं काम बंद आंदोलन, प्रवाशांचे हाल

दापोली (रत्नागिरी) , दि. १८ :  दापोली एसटी आगारात संतप्त चालक-वाहक संपकरी कर्मचाऱ्यानी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसहीत अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्याविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दापोली आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्याना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम दापोली येथील आगारात दाखल झाले. संतप्त संपकरी कर्मचाऱ्यानी दिवाकर रावते यांचा निषेध नोंदवत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी आमदार संजय कदम उपस्थित होते.

संपकरी कर्मचाऱ्यासमवेत रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना होणारा त्रास पाहून लवकर संप मिटावा यासाठी आपण तेथे गेलो होतो , मात्र सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र लोकांच्या हिताकरीता आपण असे शेकडो गुन्हे अंगावर घेवू अशी प्रतिक्रिया आमदार संजय कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली .दरम्यान, एसटी कामगारांना पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने बुधवारीही प्रवाशांचे हाल सुरु आहेत.

Web Title: The burning of the statue of Ravite in Dapoli Agathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.