अशोक बोलदे रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:49 AM2019-04-23T10:49:31+5:302019-04-23T10:50:30+5:30

रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्या निलंबनानंतर हे पद रिक्त राहिले होते. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले काम पाहात होत्या. आता जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या रिक्त जागी डॉ. अशोक बोलदे यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. ​

Ashok Bolade Ratnagiri District Surgeon | अशोक बोलदे रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदी

अशोक बोलदे रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदी

Next
ठळक मुद्देअशोक बोलदे रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदीरिक्त जागी नव्याने नियुक्ती

रत्नागिरी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्या निलंबनानंतर हे पद रिक्त राहिले होते. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले काम पाहात होत्या. आता जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या रिक्त जागी डॉ. अशोक बोलदे यांची नव्याने नियुक्ती झाली आहे.

डॉ. संघमित्रा फुले रजेवर असल्याने त्यांचा अधिभार कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संभाजी गरुड यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु तोपर्यंत डॉ. विटेकर काम सांभाळत होते. डॉ. बोलदे यांची निवड शासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी भिंगोली, बीड, सांगली येथे कामकाज पाहिले आहे.

यापूर्वी त्यांची एमपीएससीनंतर प्रथम लांजा तालुक्यात नियुक्ती झाली होती. येथे दोन महिने काम पाहिले होते.
बोलदे यांनी कार्यभार स्वीकारला असून, रुग्णालयातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी रिक्त पदाचा अहवाल आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल जनमानसातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Ashok Bolade Ratnagiri District Surgeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.