माळवाशीत ७ वर्षानंतर पालखी घरोघरी - गावकºयांसह मुंबईकरांनीही लुटला सणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 05:04 PM2019-04-03T17:04:41+5:302019-04-03T17:06:00+5:30

ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘होलियो होलियो’च्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर

After seven years of marriage, Palkhi Gharghari - villagers also looted the celebrated festival | माळवाशीत ७ वर्षानंतर पालखी घरोघरी - गावकºयांसह मुंबईकरांनीही लुटला सणाचा आनंद

माळवाशीत ७ वर्षानंतर पालखी घरोघरी - गावकºयांसह मुंबईकरांनीही लुटला सणाचा आनंद

googlenewsNext
ठळक मुद्दे पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा;

देवरूख : ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘होलियो होलियो’च्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर पालखी घरोघरी आल्याने गावात चैतन्याचे वातावरण होते. देवस्थानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ग्रामस्थांसह मुंबईकरही यात आनंदाने सहभागी झाले होते.

आंबव हनुमान स्टॉपनजीक आंब्याची होळी तोडून ढोल ताशांच्या गजरात आणि गावदेवीचा जयजयकार करत सहाणेजवळ आणून उभी करण्यात आली. २० रोजी पालखीत देवतांना रूपे लावण्यात आली. रात्री देवीचा यात्रोत्सव पार पडला. यावेळी नमनाचा कार्यक्रम पार पडला. २१ रोजी सकाळी ७.३० वाजता मानकºयांच्या उपस्थितीत होम प्रज्ज्वलित करण्यात आला. यावेळी नवविवाहित जोडप्यांनी होमात नारळ टाकला.

भिकाजी सावंत, विष्णू सावंत, चंद्रकांत कडू, शांताराम करंडे, रमेश जौरत, दीपक वास्कर, भालेकर या मानकºयांसह गावकर तुकाराम करंडे व ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. पहिले साडेतीन दिवस मानकºयांकडे पालखी फिरवण्यात आली. मानकºयांची घरे झाल्यानंतर प्रत्येक वाडीत ग्रामस्थांच्या घरोघरी पालखी फिरवण्यात आली. तरुणाईनेही पालखी नाचवत, मोबाईलमध्ये आनंदाचे क्षण टिपत हा उत्सव यादगार केला.

उत्सव शांततेत साजरा व्हावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच रवींद्र वास्कर, उपसरपंच सुनील सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले होते. याला ग्रामस्थांनीही प्रतिसाद देत यावषीर्चा शिमगोत्सव थाटामाटात साजरा केला. रुपे काढून उत्सवाची सांगता करण्यात आली.

न्यायालयाच्या निर्णयानुसार उत्सव

सन २०१३पासून गावात शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नव्हता. शिमगोत्सवापूर्वी दोन्ही गटांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी प्रतिवर्षी तहसीलदार, पोलिस ठाणे यांच्या दालनात बैठका पार पडल्या. मात्र दोन्ही गट आपल्या मतांवर ठाम असल्याने तोडगा निघत नव्हता. परिणामी १४४ कलम् देखील लागू करण्यात येत होते. देवस्थानचे सण, उत्सव हे परंपरेनुसार साजरे करावे, असा निर्णय न्यायालयाने यावर्षी दिल्याने त्यानुसार परंपरेनुसार शिमगोत्सव साजरा करण्यात आला.

 

Web Title: After seven years of marriage, Palkhi Gharghari - villagers also looted the celebrated festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.