रत्नागिरी जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४०१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 03:58 PM2019-02-15T15:58:52+5:302019-02-15T16:00:24+5:30

मार्च २०१९मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्मित झालेल्या जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी एकूण ४०१ अर्ज दाखल झाले असून सरपंच पदासाठी ९२ अर्ज आले आहेत.

401 applications for 40 panchayat elections in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४०१ अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४०१ अर्ज

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४०१ अर्जसरपंच पदासाठी ९२ अर्ज सादर

रत्नागिरी : मार्च २०१९मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्मित झालेल्या जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी एकूण ४०१ अर्ज दाखल झाले असून सरपंच पदासाठी ९२ अर्ज आले आहेत.

जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या २४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मंडणगड १२, दापोली ६, चिपळूण ८, गुहागर ९, संगमेश्वर २, लांजा १ आणि राजापूर तालुक्यातील २ ग्रामपंचायतींमध्ये या निवडणुका होणार आहे. यासाठी या सात तालुक्यांमधुन सदस्यपदासाठी एकूण ४०१ अर्ज दाखल झाले असून सरपंचपदासाठी ९२ अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया त्या त्या तहसील कार्यालयात घेण्यात आली.

१३ फेब्रुवारी रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रविवार, २४ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. सोमवार, २५ रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: 401 applications for 40 panchayat elections in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.